राहूरी फॅक्टरी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीवर मुंबईत बलात्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीवर मुंबईत बलात्कार

  राहुरी(वेबटीम) गेट टूगेदरच्या नावाखाली राहुरी फॅक्टरी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस मुंबई येथे बोलावुन तीच्यावर वे...

 राहुरी(वेबटीम)

गेट टूगेदरच्या नावाखाली राहुरी फॅक्टरी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस मुंबई येथे बोलावुन तीच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आरोपी विनायक तडसे याच्यावर राहुरी पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी फॅक्टरी येथील एका महाविद्यालयात एक २७ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. काही दिवसापूर्वी आरोपी विनायक राजेश तडसे रा. नवी मुंबई, सेक्टर नं ९, बिल्डींग नंबर १२. या आरोपीने पिडीत तरुणीला गेट टूगेदरच्या कार्यक्रमासाठी बोलावून घेतले. यावेळी आरोपीने पीडीत तरुणी बरोबर अंगलट करुन तीच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आणी नको त्या अवस्थेत फोटो काढले. सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर फोटो व्हायरल करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपी विनायक तडसे याने पिडीत तरुणीवर तीच्या इच्छेविरुद्ध वारंवार बलात्कार केला. सदर घटना ही नवी मुंबई, सेक्टर नंबर ९, बिल्डींग नंबर १२ या ठिकाणी आरोपीचे राहत्या घरात तसेच अलिबाग या ठिकाणी दि. ११ जानेवारी २०२० ते १७ जुलै २०२० या दरम्यान घडली आहे.

       याबाबत पिडीत तरुणीने राहुरी पोलिसात स्वतः हजर राहून आरोपी विनायक राजेश तडसे रा. नवी मुंबई याचे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बागुल हे करित आहे.

 गेट टूगेदरचे लोण देशभरात पसरले आहे. मात्र गेट टूगेदरच्या कार्यक्रमाची संधी साधून एका २७ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार या घटनेतून उघडकीस आलाय. त्यामुळे सामान्य तरूणी व महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत