देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा मुलीचा विनयभंग राहूरी पोलीस ठाण्यात तीन जणा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा मुलीचा विनयभंग राहूरी पोलीस ठाण्यात तीन जणांवर अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली प्रवरा येथील ११ वीत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी ही दिनांक २४ ऑक्टोबर रोजी देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजार असल्याने भाजीपाला आणण्यासाठी दुपारी दिड वाजे दरम्यान घरातून बाहेर पडली होती. रस्त्यात आरोपी अनिता पारखे ही सदर मुलीला भेटली. पाच मिनिटांकरिता घरी चल अशी म्हणाली. सदर मुलीने नकार दिल्यावर अनिता पारखे हिने तिला जबरदस्तीने तिच्या घरी नेले. थोडावेळ थांबल्यानंतर सदर मुलगी तेथून निघाली. यावेळी आरोपी विकास पारखे याने त्याची पल्सर मोटरसायकलवर चालू केली. आणि तू गाडीवर बस तूला बाजारात सोडतो. आईपण येणार आहे, असे म्हणाला. सदर मुलगी गाडीवर बसताच विकासने गाडी जोरात चालवली. मध्ये कुठेच न थांबता सरळ गुहा येथील सतिष गायकवाड या मित्राच्या घरी घेऊन गेला. मला घरी जायचे आहे. असे म्हणून सदर मुलगी रडू लागली. विकासने तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून गाडी नगरच्या दिशेने चालवली. मला तूझ्या सोबत लग्न करायचे आहे. तू काही बोलू नको. असे म्हणून त्याच्या जवळील चाकू दाखवून दम दिला. तोपर्यंत ते नगर येथील झोपडी कॅन्टींग पर्यंत पोहचले. तेथे चाकूचा धाक दाखवून कोठे काही बोललीस तर तूला ठार मारीन असा दम दिला. आणि सदर मुलीला तिथेच सोडून तो निघून गेला.
यावेळी पिडीत मुलीला तिच्या घरच्या लोकांचा फोन आला. आणि पिडीत मुलीने घडलेला प्रकार सांगितला. नंतर तिच्या चुलत भावाने तिला नगर येथून घरी घेऊन गेला. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत विकास सुनिल पारखे, अनिता सुनिल पारखे व आकाश सुनिल पारखे या तिघांविरुद्ध अपहरण व विनयभंग अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय पठारे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत