राहूरी( वेबटीम) डॉ.तनपुरे कारखाना लाभक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने गाळप मोठ्या प्रमाणात होणार असून हा विद्यमान चेअरमन न...
राहूरी( वेबटीम)
डॉ.तनपुरे कारखाना लाभक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने गाळप मोठ्या प्रमाणात होणार असून हा विद्यमान चेअरमन नामदेव ढोकणे यांचा पायगुण असल्याचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी म्हंटले आहे.
डॉ.तनपुरे कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ आज थाटामाटात संपन्न झाला. यावेळी खा. सुजय विखे, महंत उद्धव महाराज मंडलिक, माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले उपस्थित होते.अध्यक्षस्थानी रावसाहेब साबळे होते.
आपल्या भाषणात साबळे म्हणाले की, सुजय विखे यांनी कामगार, सभासद यांना न्याय देऊन त्यांची बंद पडलेली चूल पेटविण्याचे महान कार्य केले आहे.
कारखान्याच्या चेअरमनपदी नामदेव ढोकणे हे आहेत. त्यांचा पायगुण चांगला असल्याने यंदा मोठ्या प्रमाणात ऊस आहे. त्यामुळे निश्चित कारखान्याचे चांगले गळीत होऊन भरभराटी होऊन सभासद व कामगार यांना सोन्याचे दिवस येणार असल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत