श्रीरामपूर : वेबटीम बाजारभावानुसार अशोक सहकारी कारखान्याची सुमारे ५० कोटी रूपये किंमतीची १६ एकर जमिन शैक्षणिक संस्थेच्या नावे करून व भविष्...
श्रीरामपूर : वेबटीम
बाजारभावानुसार अशोक सहकारी कारखान्याची सुमारे ५० कोटी रूपये किंमतीची १६ एकर जमिन शैक्षणिक संस्थेच्या नावे करून व भविष्यात खासगी ट्रस्ट द्वारे हडप करण्याचा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा डाव आहे. शेतकरी, सभासद यांच्या पैशातून उभी राहिलेल्या या जमिनीचा मालकी हक्क कारखान्याकडेच रहावा. त्यासाठी ही जागा शैक्षणिक संस्थेस देणारा प्रस्ताव ना मंजूर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे व युवराज जगताप यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांने ३० सप्टेंबर २०१९ रोजी अधिमंडळाच्या झालेल्या वार्षिक सभेत ठराव नं. 14 अन्वये कृषी औद्योगीक शिक्षण, विकास प्रतिष्ठान, व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेस शैक्षणिक संकुलासाठी 16 एकर जमीन 99 वर्षाच्या कराराने दिली आहे. त्यासाठी मात्र प्रतिवर्ष 1 रुपया नाममात्रा भाडेपट्टा ठरला आहे. तरी गेल्या 25 वर्षापासून सदर शैक्षणिक संस्था अशोक कारखाना मालकीच्या अथवा संलग्न असलेने त्यासाठी उस उत्पादकांनी आपल्या उसातून प्रतिटन पैसे दिलेने उभ्या राहिल्या आहेत. कार्यक्षेत्रात शैक्षणिक विकास व्हावा यासाठी कोणत्याही सभासद अथवा उस उत्पादकांनी विरोध केलेला नाही. व भविष्यात करणारही नाही. 25 वर्षात कारखाना मालकीच्या जागेत कारखाना संलग्न शैक्षणिक संस्था उभ्या असून सदर संस्थेच्या विकासासाठी जागेची कुठलीही अचडण आजपर्यंत निर्माण झालेली नाही. व भविष्यात होणारही नाही. परंतु असे आसताना माजी आमदार व जेष्ठ संचालक भानुदास मुरकुटे साहेब यांनी सदर शैक्षणिक संस्थेच्या नावावर 16 एकर जागा करण्याचा काय उद्देश आहे या बाबत सभासदांना अनभिद्न्न ठेवले.
वर उल्लेख केलेल्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तात हा विषय न घेता कोरी जागा सोडून कार्यरोत्तर 14 नंबर ठरावाने मंजूरी घेतलेली आहे. कारखान्याच्या बारा हजारहून अधिक सभासदांना विश्वास न घेता केलेली कृती आहे. यावरुन माजी आमदार मुरकुटे साहेब यांचा सदर शैक्षणिक संस्था ह्या कारखान्यापासून विभक्त करुन स्वत:च्या मालकीचे खाजगी ट्रस्ट करण्याचा इरादा आहे, असे दिसते. सभासदांच्या मालकीच्या संस्था हडप करण्याचा डाव आहे. तरी त्यास मंजूरी देऊ नये.
त्याचबरोबर अशोक कारखान्याने मागील गेल्या 25 वर्षाच्या काळात चालू असलेली उस लागवड प्रोत्साहन, बेणे हमी योजना मागील वर्षी 2019 पासून बंद केली आहे. त्याबाबत काही संचालक व अधिकारी यांना विचारले असता त्यांचेकडून 10.90 कोटी रुपये शेतकर्यांकडे बेणेहमीचे थकले असल्याचे तोंडी सांगितले. परंतु सदर 10.90 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम शेतकर्यांकडे बेणे हमीची थकबाकी असल्याचे शंकासपद वाटल्याने थकबाकीदार शेतकर्यांची यादी अशोक कारखाना व प्रादेशिक सहसंचालक साखर यांना 4 ऑगस्ट 2020 रोजी लेखी अर्ज करुन मागणी केली. परंतु याबाबत कारखाना कार्यकारी संचालक साहेब यांनी गेल्या 3-4 महिन्यापासून लेखी व तोंडी प्रत्यक्ष भेटून वारंवार मागणी करुनही यादी देण्यास टाळा-टाळ केली जात आहे. एकुणच नमुद बाबींच्या अनुषंगाने अशोक कारखाना व्यवस्थापनाने बेणेहमी मध्ये ही 10.90 कोटी रुपयांची गैरव्यवहार असल्याचे वाटते. तसेच अशोक बँकेने आपल्या मर्जीतील शेतकर्यांना वाटलेले कर्ज थकल्याने सदर थकबाकीतील कर्ज अशोक कारखाना नावे टाकून अशोक बँकेची वसुली करुन घेतलेली आहे.
ही बाबही कारखाना उपविधीला छेद देणारी असून त्यामुळे कारखाना तोट्यात गेलेला आहे. तरी अशोक कारखाना मालकीची जमीन कारखाना संलग्न शैक्षणिक संस्थेच्या नावावर करण्यात येऊ नये. यामध्ये माजी आमदार व जेष्ठ संचालक भानुदास मुरकुटे साहेब यांना सदर शैक्षणिक संस्था कारखान्यापासून विभक्त करुन खाजगी ट्रस्ट करण्याचा इरादा असून हडप करण्याचा डाव आहे. सदर शैक्षणिक संस्था व 16 एकर जमीन ही आजच्या बाजारभावाप्रमाणे 49 कोटी रुपयांचा पुढे आहे. त्याचबरोबर बेणेहमी थकबाकी बाबत सखोल चौकशी होऊन शहानिशा व्हावी अशी मागणी या निवदनात करण्यात अली आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, हरिभाऊ तुवर, बाळासाहेब कदम इंद्रभान चोरमल बबन उघडे, नारायण पवार, अहमदभाई शेख, भगवान जाधव यांच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत