राहुरी(वेबटीम) नगर जिल्ह्यात गाजलेल्या बनावट डिझेल प्रकरणात राहूरीतील मुख्य सूत्रधार असलेल्या शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुद्दसर देशमुख ...
राहुरी(वेबटीम)
नगर जिल्ह्यात गाजलेल्या बनावट डिझेल प्रकरणात राहूरीतील मुख्य सूत्रधार असलेल्या शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुद्दसर देशमुख यांना अटक करण्यात आली असून ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या बुधवारी केली.
गेल्या काही दिवसांपासून बनावट डिझेल प्रकरण गाजत आहे.नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून बनावट डिझेल जप्त केले होते.तेव्हापासून मुख्य सूत्रधाराच्या पोलीस शोधात होते. दरम्यान माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी एका मंत्र्यांच्या दबावामुळे मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून त्याला अटक करावी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली होती.त्यानंतर या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला.मिटके यांनी चारच दिवसात छडा लावून राहूरी येथील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुद्दसर सय्यद यास अटक in करण्यात आली आहे.गुन्ह्यात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत