'साहेब' जिंकले, 'दादा' हरले ; 'मुकुंद' हटवून, 'हनुमंत' पुन्हा भेटीला आले..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'साहेब' जिंकले, 'दादा' हरले ; 'मुकुंद' हटवून, 'हनुमंत' पुन्हा भेटीला आले..!

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील खाकी वर्दीतील  तनपुरे पिता-पुञाच्या कार्यकर्त्यामधील संघर्षात साहेबांनी 'मुकुंदा'ना हटवून ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहुरी तालुक्यातील खाकी वर्दीतील  तनपुरे पिता-पुञाच्या कार्यकर्त्यामधील संघर्षात साहेबांनी 'मुकुंदा'ना हटवून आपल्या प्रिय भक्त असलेल्या 'हनुमंताला'भेटीला आणले आहे. त्यामुळे खाकी वर्दीच्या राजकारणात 'साहेब' जिंकले तर 'दादा' हरले, अशीच चर्चा राहुरीत रंगली आहे. दरम्यान, या घडामोडीत अखेर 'भारत'चे कोट्यावधी रुपये 'मुकुंदा'च्या कामाला आले नाहीत, हे देखील वास्तव आहे.'   आवाज जनतेचा' मधुन यापुर्वीच राहुरीतील देशमुखदारीच्या विरोधात 'साहेबां'नी रणशिंग फुकले असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते. आज अखेर मुकुंद देशमुख यांची संगमनेरला बदली झाली तर शिर्डीचे हनुमंत गाडे राहुरीला बदलून आले आहेत.


‌ राहूरी तालुक्यातील खाकी वर्दीतील राजकारणात तनपुरे पिता-पुत्रांनी 'भारत'मुळे उडी घेतली होती. साहेबांनी राहुरीची 'देशमुखदारी'  त्यांच्या जवळच्या फळीतील कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून संपविण्याची जबाबदारी घेतली होती. तर एकट्या 'भारत'च्या सांगण्यावरून दादांनी देशमुखांना राहुरीत किंवा एलसीबी मध्ये बसविण्यासाठी आटापिटा केला.


‌ दरम्यान 'भारत'ने साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्यांजवळ  देशमुखदरी हटवून देणार नाही यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायची तयारी असल्याचे बोलुन दाखवले असल्याने ही बातमी साहेबासह जवळच्या कार्यकर्त्यांना खटकली म्हणूनच की साहेबांनी देशमुखदारी हटविण्यासाठी जंग पछाडले. यात साहेबांचा विजय झाला तर भारताच्या हेकेखोरामुळे 'दादांचा' पराजय झाला अशी जोरदार तनपुरेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांत चर्चा सुरू होती. ववास्तविकता हनुमंत राहुरीतुन गेले तरीही वाड्यावर पांडुरंग भेटीसाठी त्यांच्या वाऱ्या सुरूच होत्या, त्यामुळेच ते साहेबांचे प्रिय भक्त असल्याचे उघड झाले होते,त्यांच्या भक्तीला अखेर फळ आले असून त्यांना पुंडलीकप्रमाणे राहुरीची आवडती जागा मिळाली आहे.।


‌ दरम्यान बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या झाल्या यात राहूरीतील देशमुखदारांची  बदली संगमनेरला झाली तर शिर्डीचे हनुमंत राहुरीच्या भेटीला आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत