उंबरेनगरीत रंगला दैदिप्यमान सोहळा; एकदा नक्की पहा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरेनगरीत रंगला दैदिप्यमान सोहळा; एकदा नक्की पहा

 उंबरे : वेबटीम        देशात पाश्चात्य संस्कृतीचा विस्तार झपाट्याने सुरू असला तरी,  आजही अनेक गावात आपल्या धार्मिक रूढी, परंपरा जपण्याचे काम...

 उंबरे : वेबटीम       


देशात पाश्चात्य संस्कृतीचा विस्तार झपाट्याने सुरू असला तरी,  आजही अनेक गावात आपल्या धार्मिक रूढी, परंपरा जपण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवण्याचे काम ग्रामस्थानी केलेले आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे या गावातही कार्तिक पौर्णिमेचा उत्सव साजरा करताना विठ्ठल नामाचा जयघोष करत घातलेली ग्रामप्रदक्षिणा आणि पारंपरिक फुगड्या खेलुन केलेलं रिंगण सोहळा ' याची देही, याची डोळा'  अदभुत असा ठरला

.  वै, रघुनाथ महाराज उंबरेकर यांचा पवित्र भूमीत आजही धार्मिक वारसा ग्रामस्थांनी जपून ठेवला आहे. आज कार्तिक स्नान समारोप प्रसंगी हभप गोरक्षनाथ महाराज उंबरेकर, हभप बाळासाहेब महाराज डेंगळे यांच्या मार्गदर्शनात व हिंदू धर्म प्रचारक आदिनाथ महाराज दुशिंग यांच्या अधिपत्याखाली भव्य दिव्य अशी ग्रामप्रदक्षिणा आयोजित केली होती,

गावातील हनुमान मंदिरापासून प्रदक्षिणेस सुरुवात झाली.   हभप अनुसयाबाई वाघमारे, आण्णासाहेब महाराज ढोकणे ( दुकानदार), पंढरीनाथ खंडागळे, माधवराव गरुड, रवींद्र महाराज ढोकणे, माऊली ढोकणे, सोपानराव दुशिंग, दादासाहेब ढोकणे, नानाभाऊ अडसुरे, रामभाऊ क्षीरसागर, लक्ष्मण ढोकणे, बबनराव ढोकणे, तसेच जेडी भाऊसाहेब, शिवसेना गटनेते चांगदेव ढोकणे, वस्ताद सुभाष साबळे,विलासभाऊ गरुड दत्तू ढोकणे, दिलीप डेंगळे, रविनाना ढोकणे, गोरक्षनाथ लेकुरवाळे, श्पती ढोकणे, राजू काळे आदीं शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. भगवी पताका आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर सुरू असलेल्या विठूनामाच्या जयघोषाने उंबरे नगरी दुमदुमून गेली होती. संत माऊली मंदिरासमोर झालेला फुगड्यांचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. शेवटी समस्त ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर एकत्र येत समाजासाठी कोरोनामुक्तीचे पसायदान मागत विनवणी केली, दरम्यान, गावातील विठ्ठल मंदिरात हभप एकनाथ महाराज वाघ यांच्या अधिपत्यात खिचडी प्रसाद आयोजित केला होता,  ( फुगडीचे सर्व व्हिडीओ टाकू शकलो नााही )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत