नवजात बालकांसाठी जन्मानंतर पूर्ण व एकमेव आहार म्हणजे आईचे स्तन्य, आईच्या स्तनातून स्त्रवणारे हे द्रव्य बालकाच्या ओठापर्यंत पहोचण्यासाठी आईला...
नवजात बालकांसाठी जन्मानंतर पूर्ण व एकमेव आहार म्हणजे आईचे स्तन्य, आईच्या स्तनातून स्त्रवणारे हे द्रव्य बालकाच्या ओठापर्यंत पहोचण्यासाठी आईला योग्य आहार, मानसिक संतुलन, पोषक परिसर, काळजी घेणारे, नातेवाईक, पुरेसा आराम या गोष्टींची गरज असते.
परंतु भारतामध्ये घरती अयोग्य सल्ले, अयोग्य आहार-विहार, अंधश्रद्धा, रुढी, परंपरा या सर्व गोष्टींमुळे बालकांच्या स्तनपानाला काही वेळा अडथळा निर्माण होतो.
यशस्वी स्तनपानासाठी प्रसुतीपूर्व घ्यावयाची काळजी :-
अ) आहार :- आहार 1 st Triminster पहिले 3 महिने पासून संतुलीत व सकस असावा. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेे कडधान्य, Salted फळे, अंडी, मासे & Dry Fruits असा पचेल त्या प्रमाणात घ्यावा. आहारा व्यतिरिक्त लोह(Iron) Calcium & Multivitamin ची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्लयानुसार घ्यावी. Junkfood बेकरी पदार्थ, चहा, कॉफी, कोल्ड्रींक्स टाळावे.
बाळासाठी आईचेच दुध का?
- बालकाच्या भरण पोषणासाठी योग्य पोषक द्रव्ये पचनासाठी सुलभ आणि संसर्ग व अॅलर्जी रहीत असणारे एकमेव आहार म्हणजे आईचे स्तन्य.
- आईचे दुध बालकास जंतुरहित व योग्य तापमानात असलेले मिळते.
- आईचे दुध हे बालकास अधिक बुद्धीमान बनवते.
- स्तनपान हे आई व बालकातील बंध दृढ करण्यास मदत करते.
- स्तनपान हे प्रसुती दरम्यान वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते.
- स्तनपान हे शरीरामधील प्रसुती नंतर होणाऱ्या रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करते.
- Breast & Ovarian Cancer (कर्करोग) आणि Osteoporosis या पासून आईचे संरक्षण करते .
-यामुळे पहिले 6 महिने पूर्णत: स्तनपान देणे तसेच बालकाला 2 वर्षापर्यंत चालु ठेवणे आवश्यक आहे.
बालकास स्तनपान चालु करण्यासाठीची योग्य वेळ?
प्रसुतीनंतर त्वरीत बालकास आई जवळ देणे (Skin to Skin Contact) आणि शक्य तेवढे लवकर बालकास स्तनपान द्यावे (within 1 Hr. after Delivery)
आईला स्तनातून येणारा पहिला चिका (Colastrum) चे महत्व.
प्रसुतीनंतर पहिले 2-3 दिवस जो चीकट पिवळसर स्त्राव स्तनातून स्त्रवतो त्यामधून बालकास ज्या प्रमाणात Vitamin A , vitamin k, Antibodies, आणि Immunity(प्रतिकाशक्ती) मिळते.
तसेच हे पहिले दुध (चिक) बालकाची पचनशक्ती सुधारण्यास व पहिली शी (Meconiun) होण्यास मदत करते. पहिले दुध (चिक) बालकास होणाऱ्या कावीळापासून (Physilogical Jaundice) पासून दुर करते.
हे पहिले दुध (चिक) बालकांसाठी पहिल्या Vaccine) प्रमाणे काम करते.
बालकास स्तनपान कसे व किती वेळा करावे
- नवजात बालकास वारंवार स्तनपान देण्याची गरज असते.
पहिले 10 दिवस दर 1.5 ते 2 तासांनी स्तनपान केले पाहिजे. (कमीत कमी दिवसातून 10 ते 12 वेळा)
जन्माच्या वजनापेक्षा जास्त वजन झाले व बाळ 3-10 वेळा सु (Urine) करु लागले की बालकास मागणीनुसार (Demand Feeding) स्तनपान द्यावे. (8-10 वेळा)
काही बालक 5-10 मीनीटामध्ये स्तनपान संपवतात तर काही बालके 20-30 मिनीटे घेतात.
स्तनपान करतांना एका स्तनातीन संपूर्ण दूध संपविणे गरजेचे असते.
दुध कमी पडण्याची व स्तन चुचुक (Nipple) ला तडे जाण्याची कारणे -
- आई तीचे स्तन जितक्या जास्त वेळा रिकामे करेल तितका तीचा दुधाचा पुरवठा वाढेल.
- अपूर्ण आणि कमी वेळेस स्तन रिकामे करणे, तसेच बाळ स्तनावरील पकड (Latching) चुकीची असते ही दुधाचा पुरवठा कमी होण्याची सामान्य कारणे आहेत.
हे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी म्हणजे स्तनावरील पकड(lalching) योग्य असणे गरजेचे आहे. तसेच बाळाला जास्ती जास्त वेळा अंगावर पाजणे, छातीशी लावण ((Kangaro Mother Care (KMC)
आईचे मन आनंदी, प्रसन्न ठेवणे, आईने तणाव मुक्त असणे गरजेचे असते.
स्तनावरील अयोग्य पकड हे Sore Nipple हे मुख्य कारण आहे.
स्तन चुचुक (Nipple) सारखी सारखी साफ स्वच्छ करणे, Forceful ditachment यामुळे Cracked Nipple ची लक्षणे दिसतात.
नोकरीला जाणाऱ्या आईने स्तनपाना दरम्यान घ्यावयाची काळजी
- प्रसुती नंतरचे पहिले 6 महिने आईने बाळासाठी पूर्ण वेळ द्यावा (Maternal Leave)
- 6 महिन्यानंतर बालकास वरचे अन्न चालु केल्यानंतर कामाद्या वेळेत Express करुन काढलेले दुध वाटी चमचा ने द्यावे.
- कामावर जाताना आईने दुध Express (पिळून) काढून Freeze मध्ये Store करुन ठेऊन जावे.
स्तनपाना दरम्यान आईचा आहार
- स्तनपान करणाऱ्या आईला Extra 500 kcal/day ची गरज असते.
- घरी बनविलेला सगळा आहार आई घेऊ शकते.
- सर्व प्रकारचे कडधान्य, फळे, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ आई घेऊ शकते.
- आईने पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते.
- स्तनपाना दरम्यान Junk Food चॉकलेट, Tea, Coffee, सिगारेट (Smoking) मद्यपान (Alcohol) टाळणे गरजेचे आहे.
Dr.Ravina Kadam-Kolsepatil
(Lactation Consultant)
BAMS FICH (Fellowship In Child Health, MUHS Nashik)
IYCF(Infant & Young Child Feeding Consultant) Unicef & Cornell University.
Milky Touch Lactation Hub
Kohinoor Grandear Ravet, Pune 412101
Mobile :- 9545499024
E-Mail : milkytouch.lactationhub@gmail.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत