समाधान बोडखे यांची भारतीय सैन्य दलात निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समाधान बोडखे यांची भारतीय सैन्य दलात निवड

  कोपरगाव(वेबटीम) संवत्सर रामवाडी येथील समाधान अशोक बोडखे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली समाधान याने अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये यश सं...

 कोपरगाव(वेबटीम)


संवत्सर रामवाडी येथील समाधान अशोक बोडखे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली

समाधान याने अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये यश संपादन केले त्याचे आई-वडील मोलमजुरी करुन त्यांनी त्यांच्या या कष्ट व जिद्दीला साथ दीली,त्यामुळेच त्याला यश प्राप्त झाले.त्याने प्राप्त केलेले यश आजच्या तरुणांना प्रेरनादायी आहे. त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री.मुकुंद मामा काळे यांनी केला.


कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व संजीवनी युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.श्री.विवेकभैय्या कोल्हे हे एक राखी जवानांसाठी या सारखे असंख्य उपक्रम सैनिक बांधवां प्रति आपलं कर्तव्य जपण्यासाठी राबवतात व सैन्यात सेवेत जाणाऱ्या युवकांचा विशेष आदर विवेकभैय्या कोल्हे यांच्या संभाषनात वारंवार अनुभवायला मिळतो.विवेकभैय्या कोल्हे यांनीही समाधान बोडखे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत व आम्हालाही आपल्या गावातील तालुक्यातील तरुण राष्ट्रसेवेसाठी सैन्य दलात जातोय याचा अभिमान व प्रेरणा आहे.

या वेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानाचे संचालक श्री.ज्ञानेश्वर बापु परजणे,संचालक श्री.फकीरराव बोरनारे,संवत्सर ग्रामपंचायत मा.सदस्य श्री.बापुराव बारहाते,श्री.किशोर काळे,श्री.महेश परजने


यांनीही ऊपस्थित राहुन समाधान बोडखे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देवुन अभिनंदन केले.

समाधान बोडखे यांच्या यशाचे विकास पोटे,निलेश शिंदे,महेश देवडे,शुभम बोरनारे,सुरज पोटे,युवराज ढमढेरे,विशाल शिंदे,गोकळ बोडखे आदीनीही मनापासुन कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत