राहुरीच्या ३२ गावात ' आजा मेला अन नातू झाला' - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीच्या ३२ गावात ' आजा मेला अन नातू झाला'

  देवळाली प्रवरा(वेबटीम) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी मतदार संघात जोडलेल्या  राहूरी तालुक्यातील ३२ गावांतील मांजरी ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी मतदार संघात जोडलेल्या  राहूरी तालुक्यातील ३२ गावांतील मांजरी ते आंबी असा प्रवरा काठावर रस्त्यांचे खडीकरण कामाचा झंजावती भूमिपूजन दौरा आज सकाळी केला. या दौर्‍याने त्यांचे कार्यकर्ते खूश झाले असतील पण सामान्य जनमानसात मध्ये लाभधारक शेतकरी व नागरिकांमध्ये कानडे यांच्या कथित मोठ्या निधीबद्दल हसू म्हटले आहे .ज्या रस्त्यांचे आमदार कानडे यांनी  भूमिपूजन केले ते रस्ते यापूर्वीदेखील खडीकरण करण्यात आलेले आहेत. माजी आमदार कांबळे यांच्या नंतर  लहुजी कानडे मतदारसंघांमध्ये खूप काही काम करतील अशी आशा ३२ गावातील लोकांना होती . परंतु लॉक डाउननंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कामाचा झंजावात सुरू केला असला तरी रस्त्याची मंजुरी ही फक्त मीटरमध्ये असल्यामुळे लोकांमध्ये कामदार कानडे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे  हसुसे झाले आहे.


 यापूर्वी देखील मागील आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी याच पद्धतीने १०० मीटर ते ७०० मीटर पर्यंत खडीकरणाचे काम केलेलं होतं. पुढचे निवडणुकीपर्यंत या कामावर दगड देखील राहत नाही ,असा लाभधारक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आ.लहू कानडे हुशार शिकलेले बुद्धिमान आमदार असल्याचा समज ३२ गावातील लोकांचा होता. तो त्यांच्या आजच्या धन्यवाद भूमिपूजन दौऱ्यामुळे खोटा ठरला आहे. दोन किलोमीटर करा पण पक्के काम करा अशी चर्चा पूर्व भागात उमटत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत