कुणीही असो, माझा विजय निश्चित: अशोकराव पंडित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कुणीही असो, माझा विजय निश्चित: अशोकराव पंडित

 उंबरे : वेबटीम     उंबरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आता समोर कोणीही येवो, जनता  त्यांचा काटा करून मलाच निवडून देईल, असा विश्वास सोसायटीचे ...

 उंबरे : वेबटीम 


 
उंबरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आता समोर कोणीही येवो, जनता  त्यांचा काटा करून मलाच निवडून देईल, असा विश्वास सोसायटीचे संचालक तथा प्रभाग 4 मधील संभाव्य उमेदवार अशोकराव पंडित यांनी व्यक्त केला आहे. 
 

अशोकराव पंडित हे एक सामान्य आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव व कायम हसतमुख चेहरा जनतेला आपुलकीची भावना निर्माण करून देणारा ठरतो. त्यामुळे त्यांची गावात लोकप्रियता कमालीची वाढलेली आहे. आता ग्रामपंचायत निवडणूक लागणार आहे, त्यात अशोकराव यांनी निवडणूक लढवावी, असा जनतेचा सूर आहे. त्यांच्यासाठी प्रभाग 4 मधून नियोजन सुरू आहे.

याबाबत स्वतः अशोकराव देखील इच्छुक असून पक्षाच्या श्रेष्ठीनी संधी दिल्यास मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही पंडित यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मला निवडून दिल्यास प्रभागात विकास म्हणजे काय असतो, हे दाखवून देऊ असेही त्यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत