कोपरगाव प्रतिनिधी मराठी चित्रपट अभिनेते चिन्मय उदगिरकर यांची मुख्य भूमिका असलेल्या रघु ३५० या मराठी पिक्चरचे काही प्रसंगाचे चित्रीकरण नु...
कोपरगाव प्रतिनिधी
मराठी चित्रपट अभिनेते चिन्मय उदगिरकर यांची मुख्य भूमिका असलेल्या रघु ३५० या मराठी पिक्चरचे काही प्रसंगाचे चित्रीकरण नुकतेच कोपरगाव शहरातील के जे सोमैय्या या महाविद्यालयात केल्याबद्दल मनसेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चित्रपटाचे डायरेक्ट आशिष मडके, मुख्य अभिनेता चिन्मय उदगिरकर विजय गीते, कॅमेरामन किरण तांदळे यांचे स्वागत करत आभार व्यक्त केले. तसेच या चित्रपटाचे चित्रीकरण कोपरगाव शहरात व्हावे यासाठी चित्रपट निर्माते व संपूर्ण टीम कडे सातत्याने आग्रह करणारे गोदामाई प्रतिष्ठान चे आदिनाथ ढाकणे यांचे देखील कोपरगाव मनसेच्या वतीने आभार मानले.
यावेळी बापू काकडे, नवनाथ मोहिते,युवराज पवार,संतोष मोहिते, संजय जाधव, अजिंक्य काकडे,सतीश भिंगारदिवे, अभि पवार, रितू भिंगारदिवे, अनिल सुपेकर आदी मनसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत