देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव) राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असताना आज तालुक्यातील खडांबे या एकाच गावात एकाच दिवशी तब्बल...
देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव)
राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असताना आज तालुक्यातील खडांबे या एकाच गावात एकाच दिवशी तब्बल ४२ कोरोना रूग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे.राहुरी तालुक्यात आज दिवसभरात ५१ कोरोना रूग्ण आढळले आहेत.
खडांबे गावात पहाटच्या सुमारास चालणाऱ्या काकड आरतीला जमणाऱ्या गर्दीतून ही बाधा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे समजते.
दरम्यान ४२ कोरोना बाधीत रुग्णांपैकी काहि रुग्ण विद्यापीठ, नर्सिंग होम व अन्य ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले असल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान आज तालुक्यात ५१ कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर एकाच गावात ४२ कोरोना रूग्ण सापडल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. दिवाळी नंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत