अहमदनगर(बाळासाहेब नवगिरे) कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कार्यकर्याणी बरखास्त केली आहे.महामंडळा मध्ये राजकारण आणून मराठा ...
अहमदनगर(बाळासाहेब नवगिरे)
कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कार्यकर्याणी बरखास्त केली आहे.महामंडळा मध्ये राजकारण आणून मराठा समाजातील युवकांचे नुकसान करू नये. श्री.नरेंद्र पाटील साहेब यांना परत महामंडळाच्या अध्यक्षस्थानी सन्मानाने नियुक्त करावे अशी मागणी छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंगळवार दि.१०.११.२० रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचा मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष नितिन पटारे,जिल्हाकार्याध्यक्ष देवेंद्र लांबे,उपजिल्हाध्यक्ष अविनाश सातपुते,सचिन खंडागळे आदी उपस्थित होते.
यावेळी अ.भा.छावाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे म्हंटले कि कै.आ.अण्णासाहेब पाटीलयांच्या नावाने फक्त मराठा समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी या महामंडळाची स्थापना केली होती.१९९८ पासून २०१४ पर्यंत साधारण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, हे सर्वसामान्य मराठा मुलांना माहिती पण नव्हते . सरकारने २०१६ च्या नंतर कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमदार श्री.नरेंद्र पाटील साहेब यांना महामंडळाचे अध्यक्ष केले.आपल्या वडीलांच्या नावाने असणाऱ्या महामंडळाचा माझ्या सर्वसामान्य मराठा तरुणांना उद्योजक करण्यासाठी फायदा व्हावा, त्यांना आर्थिक निधी मिळावा म्हणून आमदार श्री नरेंद्र पाटील साहेब यांनी पायाला भिंगरी बांधून संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आणि महामंडळाने पण कात टाकली होती.हजारोंच्या संख्येने मराठा तरुणांना बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा लाभ मिळाला , २०१९ रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यांनी पण आमदार श्री.नरेंद्र पाटील यांनी अध्यक्ष म्हणून काम करण्यास संधी दिली होती.परंतु संधी दिली पण अचानक मराठा आरक्षणावर स्थगिती आली , मग काय? मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून देशात सर्व प्रथम ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिले ते कै.आमदार अण्णासाहेब पाटील साहेब यांचे वारसदार शांत कसे बसतील आमदार श्री.नरेंद्र पाटील साहेब यांनी आपल्या राजकीय नफा तोटा यांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता निस्वार्थ पणे मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी प्रखरपणे मांडायला सुरूवात केली.आंदोलन, पत्रकार परिषद, मेळावा , विविध जिल्ह्यातील बैठकांना हजेरी लावली. श्री.नरेंद्र पाटील साहेब यांनी खुलेपणाने मराठा समाजाचे समर्थन केल.याचा धसका काही राजकीय मराठा राज्यकर्त्यांनी घेतला व राजकीय कुरघुड्या करून कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कार्यकर्याणी बरखास्त केली आहे.महामंडळा मध्ये राजकारण आणून मराठा समाजातील युवकांचे नुकसान करू नये. श्री.नरेंद्र पाटील साहेब यांना परत महामंडळाच्या अध्यक्षस्थानी सन्मानाने नियुक्त करावे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा नाहीतर मराठा समाज आणि सरकार यांच्या मध्ये संघर्ष हा निश्चित आहे.वेळीच सरकारने दखल न घेतल्यास भविष्यकाळात आखिल भारतीय छावा संघटना इतर समविचारी संघटनांना बरोबर घेवून कुठलीही पूर्व कल्पना न देता तिव्र आंदोलन छेडेल.होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी हि सरकारची असेल याची नोंद घ्यावी.
या प्रसंगी जिल्हा सचिव संभाजी निमसे,ज्ञांनेश्वर टेकाळे,रमेश म्हसे,अविनाश क्षीरसागर,परिमल दवंगे,महेश चव्हाण,अनिल तळोले,सुहास निर्मळ,अक्षय झिने,कृष्णा गागरे,शुभम दांगट गणेश बोबडे,कोळसे योगेश,राहुल चिंधे,मनोज शेटे,सोमनाथ चिंधे,अमोल मगर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत