जामखेड (प्रतिनिधी) येथील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यां सौ.सुमित्रा (गौरी ) शंकर कुचेकर यांची शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखपदी नुकतीच निवड क...
जामखेड (प्रतिनिधी)
येथील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यां सौ.सुमित्रा (गौरी ) शंकर कुचेकर यांची शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली. सुमित्रा कुचेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या एक बैठकीत शिवसेनेच्या
महिला तालुका प्रमुख मिरा तंटक यांनी त्यांना ही निवड जाहीर केली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय (काका) काशीद जामखेड शहर प्रमुख गणेशशेठ काळे, तालुका उपप्रमुख बोराटे मॅडम सह आदी मान्यवर उपस्थित होत. तसेच यावेळी प्रभाग ६ व ७ सह शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.प्रामुख्याने गंगुताई जाधव, अरुणा भोसले, सुनिता मोरे, वनिता भैसडे, वैशाली गौड, शोभा रणशिंग यांचा समावेश आहे. सुमित्रा कुचेकर यांचे बचतगटांच्या माध्यमातून शहरात महिलांचे मोठे संघटन असल्याने त्यांची या पदावर निवड करण्यात आली असल्याची माहिती महिला तालुका प्रमुख मिरा तंटक यांनी दिली. या निवडीमुळे नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला महीलांचे चांगलेच बळ मिळणार आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत