अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी कोपरगाव मतदार संघाला ४.७९ कोटी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी कोपरगाव मतदार संघाला ४.७९ कोटी

  कोपरगाव (प्रतिनिधी) चालूवर्षी झालेल्या पावसाने सर्व विक्रम मोडीत काढून कोपरगाव विधानसभा मतदार संघात सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली मात्र क...

  कोपरगाव (प्रतिनिधी)


चालूवर्षी झालेल्या पावसाने सर्व विक्रम मोडीत काढून कोपरगाव विधानसभा मतदार संघात सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली मात्र काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तसेच चक्रीवादळ व पुराचा देखील तडाखा बसला होता. त्यामुळे या आपत्तीतून झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना भरपाई मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकसानग्रस्तांना  महाविकास आघाडी सरकारने ४.७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिवाळीपूर्वीच मंजूर केली असून हि रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे

                      राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून संकटकाळी नेहमीच जनतेच्या मागे खंबीरपणे राहिले आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. यावर्षी जूनपासून ऑक्टोंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी, आलेले चक्रीवादळ व पुरामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई मिळावी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री ना.विजय वडेट्टीवार तसेच कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी ४.७९ कोटी रुपयांची मदत दिली आहे. यामध्ये पूर, चक्रीवादळ १.०० कोटी, अतिवृष्टी व पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसानीपोटी पशुधन खरेदीसाठी ०.३० कोटी, चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे घरांच्या झालेल्या नुकसानीपोटी घरांची दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी ८.८८ कोटी, शेतातील एस.डी.आर.एफ.च्या दराने बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ३०९.८४ कोटी व वाढीव दराने शेती पिकांसाठी १४६.६२ कोटी असे एकूण ४.७९ कोटी रुपयांची मदत दिली आहे. यापूर्वी देखील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टींच्या नुकसानीपोटी मतदार संघातील शेतकरी व नागरिकांना ३.८८ कोटींची मदत महाविकास आघाडी सरकारने देऊन एकूण जवळपास ९ कोटीपर्यंत नुकसान भरपाई  दिली आहे. 

त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून मतदार संघातील जनतेच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत