देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव) साहेबांच्या अवकृपेने राहूरीतून 'मुकुंदा' गेले मात्र 'हनुमंतरायांना' पुन्हा आपल्या चरणी आणण्य...
देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव)
साहेबांच्या अवकृपेने राहूरीतून 'मुकुंदा' गेले मात्र 'हनुमंतरायांना' पुन्हा आपल्या चरणी आणण्यास साहेब विसरले नाहीत. त्यामुळे हनुमंतप्पा हजर होण्याअगोदर वाड्यावरील आपल्या लाडक्या साहेबांच्या दर्शनाला जाणारच हे सांगण्यासाठी जोतिषीची गरज नाही.आणि त्यांच्या भक्त प्रेमरसाला असुदे ,हनुमंता असुदे असे म्हणत प्रेमाचा स्वीकार साहेब करतीलच यात शंका नाही.
हनुमंतप्पा जरी साई दरबारी होते तरी त्यांचे सर्व लक्ष राहुरीत होते. 'मुकुंदा' च्या विरोधातील सर्व गोष्टी मुकुंदाचे सवंगडी शांतपणे हनुमंतप्पाच्या कानी घालत होते.त्यावेळी हनुमंतप्पा राहुरीत उड्डाण घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पहात होते. त्याच वेळी 'भारत' मुकुंदाच्या बाजूने एकाकी लढा देत मुकुंदासाठी एलसीबीसाठी पाय घड्या टाकण्याचे जोरदार काम करीत होते. ते नसेल होत तर 'मुकुंदाला' राहुरीत ठेवण्यासाठी दादाच्या कानात डी.जे वाजवत होते. 'भारत'मुकुंदाच्या जोडीने असंख्य तडजोडी करत आपले उखळ पांढरे करून घेतल्याची जोरदार चर्चा विद्यापीठाच्या भिंतीतून वाड्याच्या अभेद्य भिंती भेदून साहेबांच्या कानावर पडत होती. त्यामुळे साहेबांचा धनुष्य आपोआप मुकुंदला शोधू लागले होते.अगदी योग्य वेळी साहेबांनी धनुष्य उचलून मुकुंदाला प्रवरातिरी धाडला. मात्र त्यासाठी भारताच्याच भात्यातील बाण वापरल्याचे समजते. वय झालं म्हणून काय फरक पडतो,दिमाग तो तेज है, अशी प्रतिक्रिया साहेबांच्या भक्तात उमटली. त्यांतून प्राजक्त जरी 'भारता'च्या दारात असला तर फुले मात्र साहेबांच्या चरणांवरच पडतात अशी धून साहेबभक्त वाड्या भोवती गाऊ लागले आहेत.
साहेबांची हनुमंतप्पावर झालेली कृपा तालुक्यासाठी कितपत योग्य ठरते हे काळच सांगणार आहे. तसे राहुरी तालुक्यात हनुमंतप्पाची भक्त मंडळी काही कमी नाही. बदलीची बातमी कळताच अनेकांनी आपल्याला आता रान मोकळे असे मनातील मांडे खायला सुरुवात देखील केली असणार. हनुमंतप्पा हजर झाल्यानंतर त्यांच्या सत्काराची रांग 'दादा'च्या सत्कारापेक्षा मोठी असेल हे निश्चित. त्यातून व्हाट्सअपमध्ये हनुमंत दर्शनाचे फोटो मोठया संख्येने फिरतील. अगदी गावातला, गल्लीतला झिपऱ्या वाढवलेला पोरगा देखील एखाद्या सज्जन नागरिकाला हनुमंतप्पा बरोबर असलेल्या संबंधाची महती सांगेल.त्यातून पुन्हा एकदा सामान्य नागरिकाला असुरक्षित वाटू नये याची काळजी हनुमंतप्पाने घ्यावी असे वाटते. आपल्या कार्यालयात वाळू तस्कर,मटकाकींग, जुगारी,कट्ट्यावाले, दलाल यांची गर्दी होऊ नये याची पण काळजी घेणे आवश्यक आहे. मंत्र्यांचे गाव आहे इथे गुन्हेगाराबरोबरच चांगली माणसे पण राहतात. याचे पण भान ठेवणे आवश्यक आहे.तुमच्या साहेभक्तीला लोक बाधा नाही. आणणार पण सज्जनाचा सन्मान करण्याचा धडा अगोदर आपल्या सहकार्यांना शिकवावा लागेल. फिर्याद घेण्यास टाळाटाळ,फिर्यादीला अरेरावी, गुन्हेगाराला अभय, एखाद्या भुरक्याचा फोन येतो आणि पोलीस खुर्चीत उभा राहतो हे आता बंद झाले पाहिजे. हे सांगा आपल्या शिपायांना, चांगले काम करणारे पण आहेत, राहुरीत शिपाई त्यांची पाठराखण करून सद्ररक्षणाय व खलनिग्रहनाय करता येईल.
सत्कार घेणं वाईट नाही पण काम न करताच घेणं हे मनाला बोचत.सत्कार कोण करतंय हे पण महत्वाचं ,फुले सुगंधित असतील ही पण त्यांना लागलेल्या हातांना जर गुन्हेगारीचा दर्प असेल तर? *हनुमंता तुझी वर्दी काय कामाची*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत