कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव संघर्ष समितीच्या वतिने विस्थापिंताना खोका शाँप त्वरित बांधून देण्यात यावे अन्यथा उपोषण केले जाईल असा इशारा नुकतेच...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव संघर्ष समितीच्या वतिने विस्थापिंताना खोका शाँप त्वरित बांधून देण्यात यावे अन्यथा उपोषण केले जाईल असा इशारा नुकतेच मुख्याधिकारी तहसीलदार साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ज्या ठिकाणी काही अडथळा नाहीत अशा ठिकाणी त्वरित खोका शाँप तयार करावे.१० वर्षापासून उद्धस्त झालेले दुकानदार आजही या खोका शाॅपच्या प्रतिक्षेत आहे.त्यामुळे प्रशासनाने त्वरित खोका शाँप गाळे बांधावे अन्यथा २ डिसेंबर २०२० रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी उपोषण केले जाईल असा इशारा या निवेदनात केला आहे
या निवेदनावर अंकुश वाघ, अकबर भाई शेख,शरद त्रिभुवन,निसार शेख,बालाजी गोर्डे,सागर कानडे,इम्रान मनियार आदिच्या सह्या आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत