आरडगाव (वेबटीम) महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाच्या दक्षिण नगर विभाग उपजिल्हाध्यक्ष पदी मानोरी येथील बाळासाहेब नारायण जाधव यां...
आरडगाव (वेबटीम)
महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाच्या दक्षिण नगर विभाग उपजिल्हाध्यक्ष पदी मानोरी येथील बाळासाहेब नारायण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अब्बासभाई शेख होते. यावेळी एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रेवन्नथ जाधव यांच्या हस्ते बाळासाहेब जाधव यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तळागाळातील गोरगरीबांना तसेच आदिवासीनां त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत राहू असे मत संस्थापक अध्यक्ष रेवन्नाथ जाधव यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी एकलव्य समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास माळी सरपंच अब्बास भाई शेख पोलीस पाटील भाऊराव आढाव तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब वसंतराव आढाव दिलीप माळी दिलीप शिंदे डॉ राजेंद्र पोटे इब्राहिम पठाण बाळासाहेब आढाव संजय पवार नवनाथ थोरात विलास थोरात सुभाष जाधव संजय पोटे आदी संघटनेचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार नूतन उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत