भारतीय संविधान म्हणजे देशाचा आत्मा - अँड. पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भारतीय संविधान म्हणजे देशाचा आत्मा - अँड. पोळ

कोपरगाव(वेबटीम) भारतीय संविधानामध्ये जनतेच्या मूलभूत हक्का बरोबरच मूलभूत कर्तव्य देखील सांगितलेली असून या संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांन...

कोपरगाव(वेबटीम)

भारतीय संविधानामध्ये जनतेच्या मूलभूत हक्का बरोबरच मूलभूत कर्तव्य देखील सांगितलेली असून या संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना  संरक्षण दिले असून भारतीय संविधान हे देशाचा आत्मा आहे असे गौरवोद्गार लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी व्यक्त केले.

लोक स्वराज्य आंदोलन व घटनाकार मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमनाने  संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रस्थाविक घटनाकार मैत्री संघाचे गौतम बनसोडे यांनी केले .कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करण्यात आला. त्याच प्रमाणे भारतीय राज्य घटनेचे पूजन करण्यात आले .तसेच तसेच या प्रसंगी राज्य घटनेच्या उद्देशिकेचे (प्रस्तावनेचे) उपस्थितांना वाटप करण्यात येऊन वाचन करण्यात आले.

यावेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की ,भारतीय राज्य घटना ही सर्व समावेशक असून या राज्य घटनेचा केंद्र बिंदू हा सर्वसामान्य नागरिक असून या देशाचा राज्यकारभार कसा चालवावा याचा संपूर्ण आलेख राज्य घटनेत नमूद केलेला आहे . त्या मुळे भारतीय राज्य घटना ही या देशाचा आत्मा आहे.

यावेळी उपस्थितांचे आभार लोक स्वराज्य आंदोलनाचे युवा शहर अध्यक्ष सुजल चंदनशिव यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमास आमनभाई मणियार,प्रताप फरताळे,दादू खरात, संजय ससाणे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत