वाढीव लाईट बिल कमी करा- कोपरगाव मनसे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाढीव लाईट बिल कमी करा- कोपरगाव मनसे

  कोपरगाव(वेबटीम) गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकार विरोधी वाढीव लाईट बिला संबंधी मोहीम उ...

 कोपरगाव(वेबटीम)

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकार विरोधी वाढीव लाईट बिला संबंधी मोहीम उघडली असून आज संविधान दिनी संबंध महाराष्ट्र भर आज २६ नोव्हेंबर रोजी जनआंदोलन पुकारले आहे.

 याचाच भाग म्हणून कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष सतीश काकडे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, अलीम शहा बापू काकडे, रघुनाथ मोहिते,संजय जाधव, संजय चव्हाण,बंटी सपकाळ, नितीन त्रिभुवन,जावेद शेख, आनंद परदेशी,सचिन खैरे, सागर महापुरे,संजय जाधव नवनाथ मोहिते आधी मनसैनिकानी कोपरगाव वीज मंडळाला निवेदन दिले.

  या निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकार ला विनंती वजा इशारा दिला आहे की कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश लोकडाऊन असतांना सामन्याचा हाताला काही कामधंदा नसतांना कसा बसा आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह केला.

परंतु याच स्थिती मध्ये महाराष्ट्र वीज मंडळाने प्रत्येक कुटूंबावर  अव्वा च्या सव्वा वीज बिल पाठविले हे लाईट बिल माफी करावी किंवा कमी करावी यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला त्यावर राज्य सरकारने आश्वासन देत काहीतरी निर्णय घेऊ असे सांगितले परंतु गेल्या आठ दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही प्रकारे लाईट बिलाला माफी मिळणार नसून डिसेंबर २०२० पर्यन्त ग्राहकांनी सर्व लाईट बिल भरावी असे सांगितले असता संपूर्ण महाराष्ट्रात मनसे ने त्यांचा या वक्तव्याचा निषेध करत लवकरात लवकर वीज बिला संबंधी ठोस निर्णय घ्या अन्यथा होणाऱ्या परिणामास तयार रहा असा इशारा देत आंदोलन पुकारले.

 यात त्यांनी वीज मंडळाला इशारा दिला की संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज ग्राहकाच्या पाठीशी असून कोणत्याही कारणास्तव वीज कनेक्शन खंडित करू नये अथवा वीज बिल भरण्याची सक्ती करू नये जर असे केल्यास काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र वीज मंडळ जबाबदार असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत