राहुरी फॅक्टरी येथे १३ नोव्हेंबर 'राष्ट्रीय आयुर्वेद दिना ' निमीत्त ड़ाॅ.शेकोकार हाॅस्पीटलद्वारे , आयुर्वेद चिकित्सा पद्धति व त्या...
राहुरी फॅक्टरी
येथे १३ नोव्हेंबर 'राष्ट्रीय आयुर्वेद दिना ' निमीत्त ड़ाॅ.शेकोकार हाॅस्पीटलद्वारे , आयुर्वेद चिकित्सा पद्धति व त्यांचे महत्त्व या विषयवार ऑन लाइन या पध्दतीने व्याख्यान अयोजन करण्यात आले.
प्राध्यापक ड़ाॅ.शेकोकार म्हणाले की आयुर्वेद चिकित्सा पद्धति चा प्रचार व प्रसार करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आयुर्वेद चिकित्सा सामान्य घटकांपर्यंत नेण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन खास राष्ट्रीय आयुर्वेद दीवस या निमित्ताने करण्यात आले.भारतासारख्या विकसनशील देशात सामान्य तरुण सशक्त होणे फार गरजेचे आहे.पाश्चात्य जीवनशैली व वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे डोके दुःखीपासुन ते कर्करोगापर्यंत टक्केवारी चिंताजनक प्रमाणात दिसुन येते.यासाठी आपल्या भारतीय संस्कृती नुसार आयुर्वेद व पंचकर्म,नाडी परीक्षा, आरोग्य कुंडली च्या माध्यमातुन आरोग्याचे रक्षण करावे.
भारत देश जागतिक स्तरावर महासत्ता होण्यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातुन अकार्यक्षम होऊ नये त्याकरिता दिर्घायुषी स्वास्थ्य संवर्धनार्थ आयुर्वेदीय निर्देशाचे व जीवनशैलीचे आरोग्यदायी पालन करावे. या करिता स्वास्थ्य आरोग्यदायी ११ लक्षणाच्या सुमूच्याला वर्णन केले ह्या मध्ये वेळेवर झोप येणे, स्वतःहून जाग येणे, स्किन ग्लोअप होने, आवाज भारदस्त असणे, हे शरीर बलवान असणे विचित्र स्वप्न न दिसणे, दिवस भर फ्रेश वाटणे, संध्याकाळी फील गुड वाटणे, मल व मूत्रचे योग्य वेळ नुसार व प्राकृतिक विसर्जन होने, जेवणाची योग्य वेळ नुसार संवेदना, रुचि व पाचन क्रिया होने अशी लक्षणा नुसार पूर्ण बॉडी चेकअप विनाखर्च केल्या जाऊ शकतात असे नमूद केले.
लेखक
डॉ.अनंतकुमार शेकोकार
मो- 9860376534
कोणत्याही टिप्पण्या नाहीत