जामखेड (अविनाश बोधले) आपल्या उत्तुंग कामाच्या यशामुळे आ.रोहित पवारांच्या युवा नेतृत्वाची पॉवर राज्याने पाहिली, अनुभवली आहे. त्यांच्या याच का...
जामखेड (अविनाश बोधले)
आपल्या उत्तुंग कामाच्या यशामुळे आ.रोहित पवारांच्या युवा नेतृत्वाची पॉवर राज्याने पाहिली, अनुभवली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत 'झी युवाने' झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात 'युवा नेतृत्व' हा सन्मान नुकताच आ रोहित पवार यांना प्रदान केला आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृतिशील युवकांच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोऊन झी युवाने त्यांचे मनोबल वाढवले आहे.
आ. रोहित पवारांच्या या सन्मानाने कर्जत - जामखेड करांचीही मान अभिमानाने उंचावली आहे. रोहित पवार हे आमदार होण्या अगोदर पासुनच आपल्या सामाजिक कार्यामुळे राज्यभर चर्चेत होते. आ. रोहित पवार यांनी पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, महिला सबलीकरण आदींबरोबरच तरुणाईसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कोरोनाच्या काळात त्यांनी राज्यभर केलेली मदत कुणीही विसरू शकणार नाही. लोकडाऊनची घोषणा झाली आणि मजूर, गोरगरीब ज्या-त्या ठिकाणी अडकून पडले अन् रोहित पवारांच्या माणुसकीचे दर्शन राज्याला पहावयास मिळाले. मतदारसंघातील अशा लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून त्यांना दिलासा दिला. कोरोना योध्दांना सॅनिटायझर, मास्क, पी.पी.ई. किट्सचे वाटप केले. सॅनिटायझरचा तुटवडा असताना मतदारसंघातीलच नव्हे तर राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात ५० हजारहुन अधिक लिटर सॅनिटायझर मोफत पुरवले. सोशल मिडियावर लाखो युवकांचे संघटन असलेल्या रोहित पवारांनी कोरोना काळातही प्रतिदिन जनजागृती करून युवकांना मार्गदर्शन केले. मतदारसंघातील कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी अत्याधुनिक कोव्हीड सेंटरची उभारणी करून ग्रामीण भागात भव्य सेंटर उभारणीचा मान त्यांनीच मिळवला आहे. अगदी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत मदतीसाठी तत्पर असणाऱ्या या तरुण आमदाराच्या 'युवा नेतृत्वाचा' अभिमान वाटणे ही कर्जत-जामखेडकरांच्या भाग्याचीच बाब आहे.
'झी युवा सन्मान सोहळा' पाहू शकता टिव्हीवरही!
आ.रोहित पवार यांच्या कर्तृत्वाची दखल घेत 'झी युवा'ने 'युवा नेतृत्व' या पुरस्काराने त्यांना नुकतेच सन्मानित केले. शनिवार दि.१४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ तर सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर हा सन्मान सोहळा प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत