राहुरी(वेबटीम) बनावट डिझेल प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते शब्बीर देशमुख यांना अटक झाल्यानंतर आता पुन्हा फसवणुकीच्या एका दुसऱ्या प्रकरणात राष...
राहुरी(वेबटीम)
बनावट डिझेल प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते शब्बीर देशमुख यांना अटक झाल्यानंतर आता पुन्हा फसवणुकीच्या एका दुसऱ्या प्रकरणात राष्ट्रवादीचा अन्य एक बडा नेता अडचणीत आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा ' त्या' नेत्याचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी राजकीय सुडापोटी या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल होऊन त्यास अटक व्हावी, या करिता पडद्याआड घडामोडी सुरू आहे.
राहुरी तालुक्यातील हा बडा नेता तसा लोकप्रिय आहे, मात्र या नेत्याच्या एका कार्यकर्त्याने काही लोकांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतले, मात्र नोकरी दिली नाही, त्यामुळे या लोकांनी संबंधीत व्यक्तीविरोधात पोलिसात धाव घेतली, आता या तपासात संबंधित व्यक्तीने कुणाच्या सांगण्यावरून व कुणासाठी ही लाखो रुपयांची माया घेतली, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे, त्यात आता राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे, वास्तविकता प्रत्यक्ष या नेत्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध दिसत नसला तरी त्या कार्यकर्त्यामुळे हा नेता अडचणीत आला आहे, त्यातच दोन दिवसांपूर्वी शँब्बीर देशमुख यांना अटक करण्यासाठी विरोधकांनी प्रशासनावर राजकीय दबाव टाकला होता, आता या प्रकरणात देखील असेच काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीचा हा नेता अडचणीत दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत