अहमदनगर (बाळासाहेब नवगिरे) दिवाळी सण हा एकत्र येऊन नातेसंबंध वाढवण्याचा सण आहे आणि म्हणूनच अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन, अहमदनगर फ...
अहमदनगर (बाळासाहेब नवगिरे)
दिवाळी सण हा एकत्र येऊन नातेसंबंध वाढवण्याचा सण आहे आणि म्हणूनच अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन, अहमदनगर फटाका असोसिएशन आणी बन्सी महाराज मिठाईवाले यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीचे औचित्य साधून वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींचा सन्मान करून मिठाई वाटपाचा कार्यक्रम पार पडलाय .
कोरोना काळात दुसऱ्याच्या बचावासाठी पोलिसांप्रमाणे सर्वसामान्यांची मदत करणाऱ्या वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने मिठाई वाटप करण्यात आलं असल्याच मत बन्सी महाराजांनी मिठाईवाले शाखेचे गोविंद जोशी यांनी मांडलय
कोरोना काळात आपली चोख भूमिका बजावनारे खरे योद्धे वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी आहे, कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या रोगामुळे झालेल्या लॉकडाऊन मध्ये देखील वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी घराबाहेर पडून बातमीदारी करत होते, संपूर्ण जिल्हा घरामध्ये बंद असतांना कोरोना पासुन नागरिकांनीं स्वतःचा कसा बचाव करावा याची माहिती प्रसारमाध्यमातून सर्व सामान्यपर्यंत पोहचवीण्याचे काम हे करत असल्याने त्यांचा छोटासा सन्मान करण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिली आहे.
दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारतो. अंधकार मिटविण्यासाठी केवळ एक तिरीप पुरेशी नाही. त्यासाठी परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही, प्रत्येक सदस्याला प्रसन्नचित्त व्हावे लागेल. जर एकसुद्धा नाराज राहिला, तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाही. आणी म्हणून अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन हि संघटना नसून एक परिवार असल्याने परिवारातील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने आम्ही कार्यक्रम घेत असुन यापुढे देखील एक ना अनेक कार्यक्रम घेण्याचे मानस असल्याची माहिती अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद यांनी दिली आहे,
दरम्यान वृत्तवाहिनी प्रतिनिधीचा सन्मान व मिठाई वाटप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्यांना बन्सी महाराज मिठाईवाले शाखेतील व अहमदनगर फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद, उपाध्यक्ष कुणाल जयकर, सचिव लैलेश बारगजे, सहसचिव रोहित वाळके, खजिनदार निखिल चौकर, सुशील थोरात, सचिन अग्रवाल, सागर दूस्सल, संजयकुमार पाठक आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत