कोल्हे परिवाराने केली कोपरगावच्या रिक्षाचालकांची दिवाळी गोड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोल्हे परिवाराने केली कोपरगावच्या रिक्षाचालकांची दिवाळी गोड

 कोपरगाव(अक्षय काळे) राज्य सरकार मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेत नसल्याने शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर बंद आहे. यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून ...

 कोपरगाव(अक्षय काळे)


राज्य सरकार मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेत नसल्याने शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर बंद आहे. यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असलेल्या कोपरगावच्या रिक्षाचालकांना याचा सर्वाधिक फटका बसला. दिवाळीसारखा मोठा उत्सवाचा सण साजरा कसा करायचा,असा प्रश्न या बांधवापुढे उभा राहिला असतांना कोपरगावकरांवरील संकटाच्या वेळी मदतीसाठी सदैव अग्रभागी असलेल्या संजीवनी उदयोग समुहाने फराळासाठीचे साहित्य देउन येथील रिक्षाचालकांची दिवाळी गोड केली. कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते रिक्षाचालकांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, रिक्षा संघटनेचे कैलास जाधव, राजेंद्र सालकर, भाजपा अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, शहराध्यक्ष दत्ता काले, साजीद पठाण रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विवेक कोल्हे पुढे म्हणाले, सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या काळात हातावरची पोटं असणा-या नागरीकांना इतर राज्यांनी आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे. कोपरगावकरांवरील संकटाच्या वेळी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नेहमीच संजीवनी उदयोग समूह मदतीसाठी धावून आलेला आहे. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी  ज्यावेळी कोपरगावकरांवर संकट आले असेल, त्या त्या वेळी त्यांना मदतीचा हात दिलेला आहे. संकटात सापडलेल्या नागरीकांना आधार देउन त्यांच्या घरात दिवा पेटावा हीच भावना कोल्हे परिवाराने आजपर्यंत जपली आहे, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी सुमारे 20 वर्षापूर्वी समाजातील सर्वच घटकातील महिलांना एकत्र करून बचत गट चळवळीच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम केले आहे. 

महिलांना ख-या अर्थान सक्षम करण्याचे काम करून त्यांच्यातील आत्मबल वाढविले आहे. हा समाजसेवेचा वारसा अखंडपणे सुरू असुन याच भावनेतून आपल्या रिक्षाबांधवाची दिवाळी गोड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिर्डीतील श्री साईबाबांचे मंदिर बंद असल्याने कोपरगावकरांना मोठी झळ बसली आहे. येथील रिक्षाचालकांना त्याचा सर्वाधिक फटका बसल्याने त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे श्री कोल्हे म्हणाले.

यावेळी रिक्षा संघटनेचे राजेंद्र सालकर म्हणाले, आम्हां रिक्षा चालकांना या कोरोनाच्या परिस्थितीत सर्वाधिक फटका बसला, मोठी आर्थीक झळ सोसावी लागली, रिक्षात बसायला आजही कोणी धजावत नाही. परंतु या संकटाची जाणीव असलेल्या सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी या बांधवाना मदत करण्याची इच्छा वारंवार बोलून दाखविली. आज प्रत्यक्ष साहित्याचे वाटप केल्याने त्यांची इच्छा पुर्ण झाल्याचे सांगितले. कैलास जाधव म्हणाले, या कोरोनाच्या काळात गरीबाला गरीबी आणि श्रीमंतांना श्रीमंती समजली, या कठीण काळात कोल्हे परिवाराने आमची दिवाळी गोड केल्याबददल रिक्षा संघटनेमार्फत आभार मानले. 


गटनेते रविंद्र पाठक, शहराध्यक्ष दत्ता काले यांचीही यावेळी भाषणे झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत