कोपरगाव(वेबटीम) शिर्डीला सदगुरू साईनाथ महाराज यांच्या दर्शनाला जाणाऱ्या साई भक्तांचे कोपरगाव येथे शिव वाहतूक सेनेकडून स्वागत करण्यात आले. को...
कोपरगाव(वेबटीम)
शिर्डीला सदगुरू साईनाथ महाराज यांच्या दर्शनाला जाणाऱ्या साई भक्तांचे कोपरगाव येथे शिव वाहतूक सेनेकडून स्वागत करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे गेले ८ महिन्यापासून मंदिरे बंद होते. परंतु नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यास महाविकास आघाडी सरकार यशस्वी झाले त्यामुळे मुख्यमंत्री उद्घवजी ठाकरे साहेबांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यामुळे भारतातील विविध राज्यातल्या साई भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डी कडे धाव घेतली. कोपरगाव येथील शिवसेना प्रेणीत शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव रेल्वे स्टेशन वर दिल्ली, गोवा व इतर राज्यातून आलेल्या साईभक्तांचे जोरदार स्वागत केले.
या वेळी वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख,तालुकाप्रमुख पप्पू पेकले,उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्राट,किरण कुऱ्हे, शहरप्रमुख जाफर सय्यद, उपशहरप्रमुख प्रवीण शेलार, राकेश वाघ,समाधान कुऱ्हे,जालिंदर आढाव, जालिंदर लगड,सुनिल आढाव, सोमनाथ संवत्सरकर,किरण धुमाळ, बंटी गिते,प्रतीक इंगळे,प्रमोद संवत्सरकर,सोमनाथ कुऱ्हे,गणपत लगड,जबा जऱ्हाड,अनिल जऱ्हाड, नीलकंठ कुऱ्हे,सुनिल आजगे, साईनाथ जाधव,हिरालाल उंडे,मयुर हरकळ,राजू महाजन,राकेश बुल्हे,दत्तू लगड,आकाश बूल्हे,माऊली लगड, जयवंत उंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत