उंबरे : वेबटिम आगामी उंबरे ग्रामपंचायत निवडणुकित आपण उभे रहावे, यासाठी सामान्य जनतेमधून आग्रह आहे. मात्र आपण अद्याप याबाबत कोणताही निर्णय...
उंबरे : वेबटिम
आगामी उंबरे ग्रामपंचायत निवडणुकित आपण उभे रहावे, यासाठी सामान्य जनतेमधून आग्रह आहे. मात्र आपण अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नसून वेळआल्यानंतर निवडणूक लढणार की नाही, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करू, असे ग्रा.पं. सदस्य दिपकरावं पंडित यांनी सांगितले. मायबाप जनता जनार्धन आणि गावातील पक्ष चालकांनी संधी दिल्यास मी पुन्हा येणार असेही पंडित म्हणाले.
पंडित म्हणाले, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेने आपल्याला संधी दिली, या संधीचे सोने करण्याचे काम आपण केले, माळवाडी प्रभागात भरीव काम करून जनतेचा विश्वास जिंकण्याचा मी प्रयत्न केला आहे, या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, रस्ते, वीज, भूमिगत गटारी आदी कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे या भागात फार नाही मात्र काही
प्रमाणात तरी मी बदल घडवून आणला आहे, खरतर मला माळवाडी एक मॉडेल व्हिलेज म्हणून पुढे आणायचे आहे, येणाऱ्या काळात माझे तसे नियोजन आहे, असो, सध्या निवडणूक लढविण्याचा विचार नाही, मात्र प्रभाग चार मधून काही कार्यक्रत्ये आग्रह धरत आहे. आमचे श्रेष्ठींनी आदेश दिले तरच निवडणूक लढणार आहे, अन्यथा पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असेही पंडित म्हणाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत