कोपरगाव(वेबटीम) १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहाचा सेनापती ...
कोपरगाव(वेबटीम)
१० नोव्हेंबर १६५९ या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहाचा सेनापती अफजलखान याचा कोथळा काढून त्याला ठार केले होते. त्यामुळे या दिवसाला शिवप्रताप दिन म्हणून ओळखले जाते व तसेच या दिवसाचे विशेष महत्व आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी कोपरगाव शिवसेनेकडून शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे म्हणाले पराक्रमाच्या बळावर मानवाने दानवशक्तीचा केलेला सर्वनाश म्हणजेच शिवप्रताप दिन. कोपरगाव सारखा अश्वारुढ पुतळा इतर कुठल्याच तालुक्यात नाही.
कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला या दिवसाचा विसर पडला आहे व पुष्पहार अर्पण करण्याचं तर सोडा साधी साफ सफाई देखील केलेली नसल्यामुळे शिवसैनिकांना हे कार्य करण्याचं भाग्य लाभले आहे आणि ते आमचं कर्तव्यच आहे आम्ही ते करणारच असे ते म्हणाले. उपशहरप्रमुख विकास शर्मा यांनी सर्व शिवभक्तांना शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा दिल्या व या पुढे कोपरगांव नगरपालिका प्रशासन पुतळ्याची स्वच्छता योग्य रितीने करेल अशी अपेक्षा केली.
या वेळी उपशहरप्रमुख विकास शर्मा, भूषण पाटणकर, गगन हाडा,आकाश कानडे, युवा नेते विक्रांत झावरे,संघटक बाळासाहेब साळूंके, नितीन राऊत, सह संघटक वैभव गिते, विशाल झावरे,उदयनराजे प्रतिष्ठानचे मयुर खरनार, विभागप्रमुख विजय शिंदे,मयुर दळवी, शैलेश वाघ, निशांत झावरे,मोनू दळवी, जुबेर अत्तार, सुशिल धाडीवाल, अक्षय नन्नवरे, अक्षय वाकचौरे, रितेश राऊत आदी शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत