गुहा : वेबटीम ' साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा...! या उक्ती प्रमाणे गुहा येथील प्रगतिशील शेतकरी तथा सोसायटीचे चेअरमन शरदराव...
गुहा : वेबटीम
' साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा...! या उक्ती प्रमाणे गुहा येथील प्रगतिशील शेतकरी तथा सोसायटीचे चेअरमन शरदराव कोळसे यांनी बलिप्रतिपदाच्या दिवशी आपल्या घरी हरिनामाचे भजन आणि वारकरी संतासाठी सस्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.
वारकरी संप्रदायाची शिकवण व संस्कार लाभलेले शरदराव कोळसे यांनी यंदाच्या दिवाळीची सुरुवात साधू संतासोबत करायची असा संकल्प करून बलिप्रतिपदा या दिवशी घरी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हिंदुधर्म प्रचारक हभप आदिनाथ महाराज दुशिंग यांच्या अधिपत्याखाली हभप नवनाथ ढोकणे, नानाभाऊ ढोकणे, जे.डी भाऊसाहेब, यशवंतराव ढोकणे, दिलीपराव ढोकणे, रामभाऊ क्षीरसागर, रवींद्र ढोकणे आदी संतजनानी आपल्या मधुर व रसाळ वाणीने हरिनामाच्या भजनाने परिसर भावमय केला होता. या भजनानंतर सस्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करून शरदराव कोळसे यांनी संतसेवेचा लाभ घेतला. दिवाळीच्या पूर्वार्धात कोळसे कुटुंबाने केलेला हा संतपूजनाचा उपक्रम वारकरी संप्रदायाला आशेचा किरण दाखवणारा आहे. यावेळी कोळसे यांनी सर्व संत भजनी मंडळाचा यथोचित सन्मान करून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या उपदेशाचे खऱ्याअर्थाने अनुकरण करून समाजालाही संतसेवेची दिशा दाखवली.
शरदराव कोळसे यांच्या घरी पार पडलेल्या या कार्यक्रमातील छायाचित्रात त्या कुटुंबाशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध असलेले स्व. भाऊसाहेब शेजुळ यांची अनुपस्थिती डोळ्यात अश्रू आणणारी ठरली. हा फोटो पाहिला तरी त्यात दादा सर्वात पुढे असते या कल्पनेने मन गहिवरून आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत