राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व असून हे आरोग्याच्या दृष्टीने बहुगुणी ठरले आहे.हेच आयुर्...
राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)
प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व असून हे आरोग्याच्या दृष्टीने बहुगुणी ठरले आहे.हेच आयुर्वेद शास्त्राचे महत्त्व आजच्या काळातही घरोघरी पोहविण्याचे कार्य डॉ शेकोकार हे करत असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी केले.
राहूरी फॅक्टरी येथील डॉ.शेकोकार हॉस्पिटल येथे शुक्रवारी राष्ट्रीय आर्युवेद दिन व आयुर्वेद चिकित्सा मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.प्रसंगी खा.लोखंडे बोलत होते. या कार्यक्रमास आ.लहू कानडे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तनपुरे कारखान्याचे संचालक मच्छिंद्र तांबे, प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन संपन्न झाले. तर उपस्थित नागरीकांना डॉ.शेकोकार हॉस्पिटलच्यावतीने आयुर्वेदिक उटणे व आयुष काढा वाटप करण्यात आले.
प्रसंगी बोलताना आ.लहू कानडे म्हणाले, कोरोना बरोबर अन्य जुनाट आजार या आयुर्वेद उपचार पध्दतीशिवाय दुसरे कुठले शास्त्र परिपूर्ण नाही. डॉ.शेकोकार यांचा आयुर्वेद शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा भेटेल यासाठी अहोरात्र झटत असल्याने त्यांचा सर्वांना अभिमान असल्याचे ते म्हणाले.
नगराध्यक्ष सत्यजीत कदम म्हणाले, डॉ.शेकोकार हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड देवळाली प्रवरा शहराच्या प्रत्येक भागात होणे अपेक्षित असून त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा.व त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, आर्युवेद शास्त्राचा गेल्या १५ वर्षांपूर्वीच मी अनुभव घेतला आहे. ही पध्दती श्रेष्ट असून 'सब ट्रीटमेंट, आयुर्वेद एकबार' असेही ते म्हणाले.
आभार मानताना डॉ.अनंतकूमार शेकोकार म्हणाले की, आधुनिक काळात एकत्रित कुटूंब प्रणाली लोप पावत असल्याने आरोग्य व आजिबाईचा बटवा संपुष्टात आले आहे. त्यामुळे सध्याच्या स्वतंत्र कुटुंब प्रणालीत अनुभव आधारित व वैज्ञानिक आयुर्वेद तज्ञ मार्गदर्शनाची गरज आहे.सध्याच्या युगात आर्युवेदची वैज्ञानिक न तपासता बाजारात अनेक गोष्टींचा सुळसुळाट यासाठी योग्य तज्ञाचें मार्गदर्शन आवश्यक आहे.
या कार्यक्रमास तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब मुसमाडे, नगरसेवक सचिन ढुस, कारखान्याचे संचालक अशोक खुरुद, अरुण ढुस, गायत्री शिक्षण संस्थेचे सतीश राऊत, दत्तात्रय कडू,ज्ञानेश्वर वाणी, राजेंद्र बोरुडे, सुधीर झांबरे, रामभाऊ काळे, डॉ.विलास पाटील, ज्योतिषशास्त्र गोपालकृष्ण रत्नपारखी, किशोर थोरात, कृषीतज्ञ डॉ.दत्तात्रय कदम, डॉ.वीर,बाबुराव कोठुळे, मच्छिंद्र कराळे, के.बी.आढाव, नंदकुमार गागरे आदी उपस्थित होते. आभार डॉ.कांचन शेकोकार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत