अहमदनगर येथील यशस्विनी महिला बिग्रेडच्या रेखा जरे यांचा खून - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगर येथील यशस्विनी महिला बिग्रेडच्या रेखा जरे यांचा खून

  अहमदनगर(वेबटीम) यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यात आल्याने एकच खळ...

 अहमदनगर(वेबटीम)

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

रेखा जरे या जातेगाव घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीरित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तसे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. रेखा जरे यांच्याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत