कोपरगाव(अक्षय काळे) कोपरगाव शहरातील खोका शॉप प्रश्न दिवसेंदिवस चर्चेत येत असून उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी विस्थापितांच्या भावनांचा ...
कोपरगाव(अक्षय काळे)
कोपरगाव शहरातील खोका शॉप प्रश्न दिवसेंदिवस चर्चेत येत असून उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडू नका अशी टिप्पणी करताच आज सकाळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हेंच्या पोपटांनी माझ्याविषयी नाहक गैरसमज परविण्याचे काम सुरू केले असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन त्यांचे कुटील कारस्थान उघड करणार असल्याचा इशारा वहाडणे यांनी दिला आहे.
कोपरगाव शहरात खोका शॉप प्रश्न चर्चेत आहे. सदर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा म्हणून व्यापारी संघर्ष समितीने उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. या उपोषणाला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे तसेच अन्य छोट- मोठ्या संघटनांनी पाठींबा देऊन आम्ही विस्थापित्यांच्या सोबत असल्याचे जाहीर सांगितले.
सर्वच पक्ष खोका शॉप प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकवटले मग विरोध नेमकी कुणाचा असा प्रश्न निर्माण होत असतानाच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मी नगराध्यक्ष झाल्यावर विस्थापितांसाठी धारणगाव रोडवरील जागेत खोका शॉप व्हावे यासाठी दोनवेळा निविदा काढल्या. मात्र निविदा कोणीही न भरल्यामुळे खोका शॉप झाले नाही. आणि नंतरच्या काळात त्याठिकाणी स्थानिक रहिवासी उच्च न्यायालयात गेल्यामुळे त्याठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीत खोका शॉप करू शकत नाही आज अशी परिस्थिती असल्याचे सांगितले.
तर काल उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी नगराध्यक्ष साहेब विस्थापित्यांच्या भावनांचा खेळ मांडू नका अशी टिप्पबी वडाडणे यांच्यावर केली तर आज सकाळी सोशल मीडिया माध्यमातून नगराध्यक्ष वहाडणे यांनी कोल्हेंच्या पोपतं माझ्याविषयी जनतेत नाहक गैरसमज करून नये असे सांगून लवकरचं पत्रकार परिषद घेऊन त्यांचे कुटील कारस्थाने उघड करणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष यांनी दिला आहे.
एकंदरीतच कोपरगाव शहरात सध्या खोका शॉप हा प्रश्न यावरून तापलेले राजकारण चांगलेच गाजत असून येत्या काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत