वळण(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील वळण येथे रस्त्याच्या वादा संदर्भात स्थळ निरीक्षण करण्यासाठी आलेल्या तहसीलदारांनी मोटरसायकलवरून तब्बल ती...
वळण(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील वळण येथे रस्त्याच्या वादा संदर्भात स्थळ निरीक्षण करण्यासाठी आलेल्या तहसीलदारांनी मोटरसायकलवरून तब्बल तीन किलोमीटर प्रवास केला आहे. तसेच उसाच्या शेतामधून अडगळीच्या ठिकाणी घटनास्थळी जाण्यासाठी अडचणीतून मार्ग शोधत तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन तर निरीक्षण कल्याने शेतक-यांमधे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राहुरी तालुक्यातील वळण आणि मानोरी शिवारामध्ये रस्त्याच्या वादासंदर्भात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.त्यानुसार तहसीलदार यांनी आज घटनास्थळी स्थळ निरीक्षण करण्यासाठी आले असता या ठिकाणी काही भागात जाण्यासाठी रस्ता खराब असल्याने थेट मोटरसायकलवर स्वार होत तीन किलोमीटरचा प्रवास केला आहे .
तसेच उसाच्या शेतामधून रस्त्याचा मार्ग शोधत त्या ठिकाणी जात वादी प्रतिवादी यांच्या समस्या ऐकून घेत घटनास्थळी पंचनामा केला आहे या प्रसंगी मानोरी चे सरपंच आब्बास शेख, पोलिस पाटील भाऊराव आढाव, बाजार समितीचे संचालक दत्तात्रय खुळे, पोलीस पाटील सोमनाथ डमाळे,कारभारी खुळे, तलाठी रविंद्र बाचकर,महसुल कर्मचारी महेश देशमुख, बाळासाहेब खुळे,बाळासाहेब आढाव, बाळासाहेब काळे, बाळासाहेब शिंदे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत