वाजलं रे वाजलं... याद्या प्रसिद्ध ; उंबरेत राजकारण तापलं..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाजलं रे वाजलं... याद्या प्रसिद्ध ; उंबरेत राजकारण तापलं..!

 उंबरे ः वेबटीम    तालुक्याचे लक्ष लागलेल्या उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर गावातील राजकीय वात...


 उंबरे ः वेबटीम 


 
तालुक्याचे लक्ष लागलेल्या उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर गावातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे. या याद्यांची चाचपणी करून आपल्यासाठी सुरक्षित प्रभाग पाहतानाच पक्ष श्रेष्ठींकडेही उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी लॉबींग़ सुरू केल्याचे दिसून येत आहे.  दरम्यान, या निवडणुकीत 18 ते 23 वयोगटाच्या मतांची आकडेवारी लक्षणीय असल्याने ही मते निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्टपणे दिसणार आहे.

      उंबरे गावात तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांचे वर्चस्व आहे. आदिनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे मार्गी लागलेली आहेत. या कामांचा जोरावर आदिनाथ सेवा मंडळ जुन्या-नव्या उमेदवारांचा मेळ घालून निवडणुकांना सामोरे जाणार आहे. तर कारखान्याचे माजी संचालक सुनिल आडसुरे यांचे जनसेवा मंडळ तुल्यबळ उमेदवार घेवून निवडणूक लढवण्याचे नियोजन करत आहे. मात्र गावच्या विकासासाठी कोणती तडजोड करावी लागली तर त्यांची तयारी असल्याचे कानावर पडत आहे. याउलट तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष साहेबराव दुशिंग यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ते समविचारी लोकांना सोबत घेवून आखाड्यात उतरण्याच्या  तयारीत आहे. याशिवाय शिवसेना, भाजपचा एक गट सोबत घेवून छत्रपती प्रतिष्ठाणचीही मोर्चेबांधणी सुरू असली तरी याबाबत अजुन अंतिम निर्णय झालेला नाही. अशाप्रकारे गावात राजकीय खलबते सुरू आहेत. त्यात आज ग्रामपंचायतीच्या पाच प्रभागांची नवीन मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. या यादीचे अनेकजण बारकाईने वाचन करत आहेत. कोणत्या गटाचे किती मते यावरच उमेदवारी ठरणार आहे. त्यामुळे याद्या पाहण्यासाठी आज सकाळी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. तर काहींनी झेरॉक्सही मारून घेत अभ्यास सुरू केला आहे. यामध्ये प्रभाग पाचचा विस्तार झाला आहे. तर प्रभाग दोनमधील समिकरणेही बदलली आहे. प्रभाग तीन, चार आणि एक हे मात्र पुर्वीप्रमाणेच असणार आहेत. त्यामुळेच गावातील स्थानिक नेत्यांची आपापल्या प्रभागात पकड कायम असणार आहे. परंतु, शेवटच्या क्षणी कुणाला उमेदवारी, कोण कुणासोबत यावरच हे चित्र अवलंबून असणार हे तितकेचं खरं..! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत