देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सत्ताधारी गटातील नगरसेवकांचा राजीनाम्याचा फुसका बार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सत्ताधारी गटातील नगरसेवकांचा राजीनाम्याचा फुसका बार

देवळाली प्रवरा(वेबटीम)        देवळाली प्रवरा नगर पालिकेतील सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने गेल्या काही दिवसापुर्वी मुख्याधिकारी अजित निकत या...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

       देवळाली प्रवरा नगर पालिकेतील सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने गेल्या काही दिवसापुर्वी मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे राजीनामा  दिला होता. परंतू मुख्याधिकारी निकत यांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कानावर हि गोष्ट घातली असता काहि दिवस थांबण्यास सांगितले होते. १ डिसेंबर रोजी राजीनाम्यावर चर्चा करण्याचे ठरले होते.नगराध्यक्ष कदम आजारी असल्याने राजीनाम्यावर चर्चा झालीच नाही. अखेर सत्ताधारी गटातील एका  नगरसेवकाचा राजीनाम्याचा फुसका बार निघाला.

           देवळाली प्रवरा नगर पालिकेची ११ महिण्यावर निवडणूक आली आहे. सध्या सत्ताधारी गटातील पाच ते सहा नगसेवकांमध्ये  नाराजी असून तेही राजीनाम्याच्या तयारीत आहे. परंतू पहिला राजीनामा कोण देणार याबाबत अनेक दिवसा पासुन खलबत सुरु होते. कारखाना येथील प्रभागातून निवडून आलेला एका नगरसेवकाने गेल्या आठ दिवसा पुर्वी मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे राजीनामा दिला. मुख्याधिकारी निकत यांनी राजीनामापञ स्वतः जवळ ठेवून घेत नगराध्यक्ष कदम यांच्या कानावर नगरसेवकाच्या राजीनाम्याची गोष्ट घातली. नगराध्यक्ष कदम यांनी त्या नगरसेवकास राजीनामा देण्यापासुन काही दिवस थांबवा. १ डिसेंबर रोजी त्यावर निर्णय घेवू मंगळवारी सकाळी नगराध्यक्ष कक्षातील अँटीचेंबर मध्ये गटनेते, उपनगराध्यक्ष, एका नगसेविकेचा पति, मुख्याधिकारी आदींनी राजीनामा देणाऱ्या नगरसेवकाबरोबर चर्चा केली. नगराध्यक्ष कदम आजारी असल्याने राजीनाम्याचा निर्णय  मागे घ्यावा अशी चर्चा झाल्याचे समजते परंतू  राजीनामा देणाऱ्या नगरसेवकाने काय निर्णय घेतला हे समजले नाही. 

                 सत्ताधारी गटातील पाच नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत होते. परंतू गेल्या आठ दिवसापुर्वी राजीनामा दिलेल्या नगरसेवकाचा फुसका बार निघाल्याने या पाच हि नगरसेवकांनी सावध पविञा घेतला आहे.नगराध्यक्ष कदम आजारपणातुन सावरल्यानंतर  त्या नगरसेवकाच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले.

 पँकेज वाढविण्यासाठी राजीनामासञ ?

                देवळाली प्रवरा नगर पालिकेची ११ महिण्या नंतर सार्वञिक निवडणूक होणार आहे. निवडणूकीचा खर्च भागविण्यासाठी आता पासुन तयारी सुरु केली आहे.राजीनामासञ सुरु करुन सत्ताधारी नेत्यावर दबाव तंञाचा वापर नगरसेवकांनी सुरु केला आहे. राजीनामा दिल्या नंतर सत्ताधारी नेते पँकेज वाढवून देतील अशी आशा नगरसेवकांना वाटत आहे.त्यामुळेच राजीनामासञ नगरसेवकांनी सुरु केले असल्याची चर्चा नागरीकांमध्ये सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत