संगीत शिक्षण नविन पिढीसाठी प्रेरणादायी- राजेंद्र झावरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संगीत शिक्षण नविन पिढीसाठी प्रेरणादायी- राजेंद्र झावरे

  कोपरगाव (प्रतिनिधी)  संगीतात जी ताकत आहे ती आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही सध्याच्या सरकारचे संगीत शिक्षणाच्या बाबतीत सकारात्मक धोरण असल्य...

 कोपरगाव (प्रतिनिधी) 

संगीतात जी ताकत आहे ती आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही सध्याच्या सरकारचे संगीत शिक्षणाच्या बाबतीत सकारात्मक धोरण असल्याने भविष्यात  संगीत क्षेत्रात चांगली संधी उपलब्ध होणार आहे  नविन पिढीसाठी संगीत शिक्षण नक्कीच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्ह्याप्रमुख कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा राजेंद्र झावरे यांनी केले नाद संगीत विद्यालय कोपरगाव शाखेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हार येथील संगीत अलंकार श्री.राजेंद्र चितळकर गुरुजी होते त्यांनी पुरातन काळापासून संगीत क्षेत्राला राजाश्रय होता त्यामुळेच अनेक कलाकार आजतागयत टिकुन असल्याचे सांगत आजही राजाश्रय देऊन ही संस्कृती टिकविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे असे सांगितले त्यांनी राग गाऊन सर्वांना मंत्र मुग्ध केले.

    ह भ प साईकथाकार बाळकृष्ण सुरासे महाराज यांनी बोलतांना वारकरी संप्रदायामुळे संस्कृती टिकुन असल्याचे सांगत नविन पिढी घडविण्यासाठी नाद संस्थेचे संचालक ह भ प शंकर महाराज गोंडे वारीकर करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी प्रास्तविक करून उपस्थितांचे स्वागत केले .

तसेच शिवसेना शहरप्रमुख कलविंदरजी दडीयाल यांनी संस्थेच्या वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व  श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ह भ प उकिरडे महाराज, ह भ प योगेश महाराज करंजीकर ,शिवसेनेचे विधानसभा संघटक अस्लमभाई शेख , गायनाचार्य विनायक महाराज टेके ,ह भ प प्रकाश महाराज गायकवाड,विलासराव गोंडे ,कैलासराव गोंडे,ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे ,नाईक सर, जय नवले यांचे सह नाद संगीत विद्यालय वारी शाखेचे विध्यार्थी  वैष्णवी टेके , प्राजक्ता सोनवणे , सबुरी नवले , राघव पाटील , यश भड ,संदेश आदमणे  यांचे गायन व वादन संपन्न झाले त्याचा उपस्थितांनी आनंद घेतला यावेळी पालक देखील उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत