राहुरी(वेबटीम) राज्यातील वीज ग्राहक व सामान्य जनतेचे व शेतकऱ्यांची विज बिल माफ करण्याची मागणी छावा क्षात्रवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ...
राहुरी(वेबटीम)
राज्यातील वीज ग्राहक व सामान्य जनतेचे व शेतकऱ्यांची विज बिल माफ करण्याची मागणी छावा क्षात्रवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले की, मार्च महिन्यापासून करोणा महामारी मुळे अनेकांचे रोजगार गेलेले असून उद्योग व्यवसाय बंद पडले होते. या काळात महावितरण वीज कंपनी घरगुती व व्यावसायिक वीज बिले मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. तसेच अनेक गोरगरीब हातावर पोट भरत आहेत यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झालेली आहे. या कोरोनाच्या महामारीत संस्थेने कुठल्याही प्रकारची रीडिंग न घेताता अंदाजे अव्वाच्या सव्वा बिले करण्यात आली आपले सरकार सत्तेवर आले तेव्हा आपण शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेला वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. तरी ते आश्वासन आपण पूर्ण करावी व आपणास विनंती की 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत संपूर्ण विज बिल रीडिंग प्रमाणे दुरुस्त करून द्यावे तसेच बिलामध्ये आलेले इंधन आकार स्थिर आकार विलंब आकार थकबाकी वरील व्याज या सर्व करामध्ये दुरुस्ती करून मिळावी. व सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना वीज बिल माफ करावे अन्यथा छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्याच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आपले सरकार विरोधात आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी असा इशारा छावा क्षात्रवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतिश सौदागर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष विजय पारखे ,अविनाश निठवे, कैलास धाकतोडे, राहुल शेटे, नंदू उल्हारे, तात्या गोरे इम्रान शेख, रविराज विटनोर ,गणेश लोंढे आदी कार्यकर्ते यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत