कोपरगावचे आमदार आणि नगराध्यक्ष यांना पंचांग भेट देणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचे आमदार आणि नगराध्यक्ष यांना पंचांग भेट देणार

  कोपरगाव (वेबटीम ) कोपरगाव तालुक्याचे आमदार आणि लोकप्रिय नगराध्यक्ष हे घोषणा करण्यात पटाईत असून नुकतीच दोघांनीही निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेद...

 कोपरगाव (वेबटीम)

कोपरगाव तालुक्याचे आमदार आणि लोकप्रिय नगराध्यक्ष हे घोषणा करण्यात पटाईत असून नुकतीच दोघांनीही निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची लोकप्रिय घोषणा केली होती.मात्र अद्याप तरी या घोषणाचा त्यांना मुहुर्त सापडला नाही.म्हणून लोक स्वराज्य आंदोलनाच्यावतीने त्यांना पंचांग भेट देण्यात येणार असल्याची माहिती लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, मागील वर्षी लोकप्रिय नगराध्यक्ष यांनी कोपरगाव शहरातील निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली होती.

 तसेच मागील काही महिन्यांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी देखील तालुक्यातील विविध विकास कामे नित्कृष्ठ करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणाबाजी केली.मात्र अनेक दिवस होऊन गेले तरी त्यांना ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा मुहूर्त सापडत नाही.त्यामुळे या घोषणा फक्त घोषणा फक्त ठेकेदारांना भीती दाखवण्या पुरत्या होत्या का? किंवा या घोषणेनंतर खरोखरच कामाचा दर्जा सुधारला आहे. या बाबत शंका निर्माण झाल्या असून ठेकेदार यांच्या सोबत संगनमत करून सर्व काही आलबेल सुरू आहे सरकार कोट्यवधी रुपये विकास कामावर खर्च करते. 

मात्र राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार नित्कृष्ठ कामे करतात आणि सरकार चा पैसा वाया जाऊन जनतेच्या पदरी निराशा पडते लोक प्रिय नगराध्यक्ष व आमदार यांना खरोखर विकास कामे उत्कृष्ट व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी ठेकेदारांची काळी यादी लवकरात लवकर जाहीर करावी.

अन्यथा या बाबतचा मुहूर्त सापडत नसेल तर लोक स्वराज्य आंदोलनाच्यावतीने या प्रतिनिधींना लवकरच पंचांग भेट देण्यात येणार असून त्यात चांगला मुहूर्त पाहून त्यांनी ठेकेदारांची काळी यादी जाहीर करावी म्हणजे यापुढे निकृष्ट विकास कामे होणार नाहीत असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत