म्हैसगावचे सरपंच महेश गागरे यांच्यावरील अविश्वास ठरवाबाबत मतदान प्रकिया सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

म्हैसगावचे सरपंच महेश गागरे यांच्यावरील अविश्वास ठरवाबाबत मतदान प्रकिया सुरू

  म्हैसगाववरून लाईव्ह(गोविंद फुणगे) राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील सरपंच महेश गागरे यांच्यावर आलेल्या अविश्वास ठराव बाबत आज सकाळी ग्रामसभ...

 म्हैसगाववरून लाईव्ह(गोविंद फुणगे)

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील सरपंच महेश गागरे यांच्यावर आलेल्या अविश्वास ठराव बाबत आज सकाळी ग्रामसभेमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असून मतदान झाल्यानंतर सायंकाळपर्यंत या अविश्वास ठराव बाबत सरपंच तरणार की हरणार यासंदर्भात निकाल दिला जाणार आहे..

अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच यांच्यावर अविश्वास ठरावआला होता. जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने जिल्हाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.म्हैसगाव येथील लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावर सहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता त्यानुसार ्रामसभेमध्ये आज सकाळी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होऊन सदर सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव संमत करायचा ही अविश्‍वास ठरावाला विरोध करायचा याबाबत गुप्त मतदान प्रक्रिया सुरू झालीय...  

सकाळ पासून मतदानाला प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती..पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्यासह 20 पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता यावेळी सरपंच महेश गागरे यांनी मी कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

तर सरपंच यांच्या मनमानी कारभाराला लोक त्रस्त झाले आहेत त्यामुळे हा अविश्वास ठराव यशस्वी होईल असे देखील उपसरपंच यांनी सांगितलेय

यावेळी  मतदान प्रक्रियेचे संपूर्ण माहिती तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी दिली आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत