राहूरी व श्रीरामपूर मतदारसंघात आ.निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी व श्रीरामपूर मतदारसंघात आ.निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना

 वळण(गोविंद फुणगे)   एकदा सत्तेची हवा डोक्यात गेली की,त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला समजावा.म्हणून मला कधीही मी आमदार झालो म्हणून वाटत नाही ...

 वळण(गोविंद फुणगे)

  एकदा सत्तेची हवा डोक्यात गेली की,त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला समजावा.म्हणून मला कधीही मी आमदार झालो म्हणून वाटत नाही तर सत्तेची हवा हि कधीही डोक्यात जावु न देता मी एक  सामान्य कार्यकर्ता म्हणून वावरत असतो,मी आमदार आहे हे मला आजही खरे वाटत नाही. नव्हे नव्हे तर आमदार निलेश लंके म्हणजे ऍडजेस्टटेबल पान्हा आहे कुठेही एकदम फिट बसतो असे प्रतिपादन पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोप्रतिनिधी आ.निलेश लंके यांनी केले.

 राहूरी तालुक्यातील मांजरी व वळण परिसरात निलेश लंके समर्थकांनी मंगळवारी निलेश लंके युवा प्रतिष्ठाणची स्थापना केली. प्रसंगी आ.लंके बोलत होते.

राहुरी तालुक्यातील मांजरी येथील कार्यक्रमाला आमदार निलेश लंके येणार आहेत याची माहिती समजताच शेकोडो तरूणांनी  राहुरी शहरात,आरडगाव, मानोरी,वळण,मांजरी या परीसरात रस्तावर उभे रहात ढोली-बाजाच्या गजरात,फटाक्यांच्याच्या आतीश बाजीत लंके यांचे स्वागत करून ठिकठिकानी सत्कार केले.तसेच आमदार लंके यांना पहण्यासाठी राञी उशीरापर्यंत अनेकांनी मोठी गर्दी केली होती. 

पुढे बोलताना आ.नीलेश लंके म्हणाले की, माझ्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी असती,पारनेर विधानसभाच नव्हे तर महाराष्ट्र मध्ये माझा चाहतावर्ग आहे, आमच चाललो की रॅली अन्  थांबलो की सभा सुरू होती कार्यकर्ते जुळवणं हा माझा छंद आहे. आणि हो लोकसभा मला काय लढवायची  नाही तेवढा मोठा मी नाही  असेही आ. निलेश लंके म्हणाले.

     यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाढे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.राहुल झावरे,नेवासा शिवसेनेचे नेते बाळासाहेब पवार,माजी उपसभापती रवींद्र आढाव, सरपंच विठ्ठल विटनोर, अण्णासाहेब दादा थोरात ,राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, अण्णासाहेब सोडनर, भाऊसाहेब विटनोर, बापूसाहेब विटनोर, आप्पासाहेब जाधव, सूनील कोकरे ,हरिदास जाधव, कारभारी पोपळघट, नितीन कांबळे,निलेश लंके प्रतिष्ठाण चे  प्रमोद विटनोर, पोपटराव बाचकर, शैलम विटनोर, प्रसाद उंडे, योगेश विटनोर,किशोर बाचकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत