म्हैसगाव सरपंचावरील अविश्वास ठराव अखेर मंजुर; ग्रामसभेने दाखवला घरचा रस्ता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

म्हैसगाव सरपंचावरील अविश्वास ठराव अखेर मंजुर; ग्रामसभेने दाखवला घरचा रस्ता

गोविंद फुणगे/राहुरी          राहुरी तालुक्यातील म्हैसगांव येथील लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध झाल्याल्या अविश्वास प्रस्ताव हा 1...


गोविंद फुणगे/राहुरी 


       

राहुरी तालुक्यातील म्हैसगांव येथील लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध झाल्याल्या अविश्वास प्रस्ताव हा 116 मतांनी बहुमतात समंत झाला असुन लोकनियुक्त सरपंच यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागल आहे.

     


आज  विशेष ग्रामसभात झालेल्या गुप्त मतदानात 2277 पैकी एकुन 1479  मतदान झाले.त्यामुळे ठरावाच्या बाजुने 756  तर ठरावाच्या विरोधातत 640 मत पडली तर 83  मते बाद झाली.त्यामुळे सरपंच यांच्यावर आलेला अविश्वास ठराव हा बहुमताने झाला .त्यामुळे ग्रामस्थांनी  सरपंच महेश गागरे सरपंच यांना आपल्या पदावरून पायउतार होऊन घरचा रस्ता दाखवला आहे.

        अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आला होता लोकानियुक्त सरपंच याच्यावर आलेल्या अविश्वास ठराव हा जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने जिल्हाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. येथील लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावर सहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता त्यानुसार ग्रामसभेमध्ये आज सकाळी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होऊन सदर सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव संमत करायचा ही अविश्‍वास ठरावाला विरोध करायचा याबाबत गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळ पासून मतदानाला प्रचंड  ठिकाणी झाली होती. पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्यासह 20 पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता तर निवडून अधिकारी म्हणून तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी काम पाहीले.तर सहाय्यक निवडणूक अधिकारी गट विकास अधिकारी गोविंद खामकर यांनी सहाय्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत