अगस्ती सक्षमपणे सुरू, विरोधकांनी चिंता करू नये - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अगस्ती सक्षमपणे सुरू, विरोधकांनी चिंता करू नये

अकोले प्रतिनिधी  अगस्ती सक्षमपणे चालू असून विरोधकांनी त्यांची चिंता करू नये अकोले तालुक्यात अगस्ती कारखाना निवडणुकांना  अजून  अवधी आहे. एप्र...

अकोले प्रतिनिधी 

अगस्ती सक्षमपणे चालू असून विरोधकांनी त्यांची चिंता करू नये अकोले तालुक्यात अगस्ती कारखाना निवडणुकांना  अजून  अवधी आहे. एप्रिल - मे  मध्ये होऊ शकतात. निवडणुकीसाठी मतदार  यादी  अजुन  निश्चित नाही, तोच विरोधकांच्या जोर बैठका सुरू झाल्याची अशी  टीका माजी मंत्री  मधुकरराव  पिचड केली. तर माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार यांनी तालुक्याला यावर्षी मिळालेली २९ कोटींची सर्वात कमी नुकसान भरपाई  आमदारांचा नाकर्तेपणा असल्याची टीकाही त्यांनी  केली . 

 अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  कोतुळ उपबाजार आवारात बाजार समितीच्या  पेट्रोल- डिझेल पंपाचा  लोकार्पण सोहळा तसेच  शॉपिंग सेंटर चे भूमीपूजन  50 टनी वे ब्रीज वजन काट्या  चे  उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  बाजार समितीचे  सभापती  परबतराव नाईकवाडी होते.

 यावेळी पिचड म्हणाले की, अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती अडचणीत असताना  उभी केली आता  या समितीमार्फत  कोतुळ उपबाजार   उभा राहत आहे.  त्यामुळे परिसराच्या विकासाला  हातभार  लावणारा आहे.आपण मुळा बांधणीचे काम केले आंबित पासून साकुर पर्यंत बंधारे बांधले.   यामुळे आदिवासी शेलद वाघ दरी सारख्या आदिवासी  भागात शेतकरी ऊस पिकवू लागला  पिंपळगाव खांड धरणाची साईट  शोधण्यासाठी मी पायी गवत तुडवले आदिवासी उपयोजने तुन  मी निधी दिला धरण मार्गी लावले मात्र या धरणाचे जलपूजन करणारे विरोधक मलाच शिव्या घालत असल्याची  खंत त्यानी व्यक्त केली.



निवडणुकीत मला सोडून जाणाऱ्यां ची काळजी करू नका  जनता माझ्याबरोबर आहे. जिल्हा बँकेचे   अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यामुळे  अगस्तीला पैसे उपलब्ध झाले. दिवाळी व कोरोना काळात शेतकऱ्यांना 125 रुपये प्रतिटन  दिले .अगस्ती सुरळीत व चांगला  चालू असून विरोधकांनी त्याची काळजी करू नये.यापुढे ही अगस्ती पूर्ण  ताकदीने पुढे  प्रगतीपथावर  न्यायचे काम करायचे आहे असे  ते  म्हणाले.

शॉपिंग सेंटरला मधुकरराव पिचड शॉपिंग सेंटरचे असे नामकरण करण्याचा ठराव  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाने केल्याने पिचड यांनी संचालक मंडळाचे  आभार मानले.

माजी आमदार वैभवराव पिचड यांनी ही  तालुक्यातील विरोधकांवर हल्ला चढवला.  अगस्ती  कारखान्यासाठी   विरोधकांच्या  गावोगाव बैठका सुरू आहे.  विरोधकांकडे कारखाना दिला होता त्यावेळी तुम्ही त्यात  होता. तेव्हा तुम्ही काय केले हे लोकांना माहित आहे असे  सांगत 

आमदारकीच्या वेळी  विद्यमान आमदारांनी अनेक स्वप्न दाखविली  पूल आणि  खड्यांचे राजकारण केले  नवीन कोणतेही विकासाचे कामे केले नाही मी भाजप प्रवेश केला .यावेळी  त्यावेळी जे कामे मंजुर  होते तेच कामे सुरू आहे. नवीन  कोणतेही काम सुरू  नाही केवळ भुलभुलैया  सुरू असल्याची टीका  वैभव पिचड यांनी केली.

या प्रसंगी सभापती परबत नाईकवाडी यांनी सांगितले . बाजार समितीने  काटकसरीतून आर्थिक अडचणीवर  मार्ग काढला कर्मचारी शेतकऱ्यांना सेवा सुविधा  देऊन लोकांचा विश्वास मिळविला कोतुळ उपबाजार परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणांना आहे हे मार्केट नावारूपाला येईल बाजार समिती मध्ये लवकरच ओपन मार्केट  कांदा खरेदी धोरणं सुरूं करण्यात येणार आहे यामुळे   शेतकऱ्यां ना कांदा   गोणीचा  प्रत्येकी 50 रुपये खर्च  वाचेल  शेतकऱ्यना कांदा ट्रक, ट्रेकटर मध्ये  आणता येईल असे बाजार समितीचे  सभापती परबत नाईकवाडी  यांनी सांगितले.

 यावेळी जिल्हा परिषद गटनेते  जालिंदर वाकचौरे, जिल्हा परिषदेचे माजी  उपाध्यक्ष सीताराम देशमुख,  वाघापुरचे  भाऊसाहेब बराते  हिंदुस्थान पेट्रोलियम चे  कार्यकारी अभियंता आनंद शिंदे,    कोतुळ चे राजेंद्र पाटील देशमुख,यांनी मनोगत व्यक्त केले   


यावेळी    जेष्ठ नेते गिरजाजी जाधव  पंचायत समिती सभापती उर्मिला राऊत,  सदस्य श्रीमती जगधने ,भाजपा चे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे  माजी सभापती सुधाकर देशमुख, यशवंत आभाळे, जे डी आंबरे ,गणपत देशमुख,अगस्तीचे संचालक बाळासाहेब देशमुख, रावसाहेब वाळुंज,रोहिदास भोर, आनंदराव वाकचौरे, भाऊसाहेब कासार आप्पासाहेब आवारी,सयाजीराव देशमुख, सुभाष वायळ, श्रीमती हौसाबाई हांडे , लक्ष्मण कोरडे, संगीता गोडसे  एच पी सी एल चे  विक्री अधिकारी निखिल वारकर  ,बाजार समितीचे  सचिव अरुण आभाळे आदी स ह परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन संचालक बाळासाहेब सावंत यांनी केले तर आभार संचालक विजय लहामगे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत