राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथील प्रकरणी आज दिनांक २० नोव्हेंबर राहूरी पोलीस ठाण्यात संदीप विष्णू साळुंके यांच्...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथील प्रकरणी आज दिनांक २० नोव्हेंबर राहूरी पोलीस ठाण्यात संदीप विष्णू साळुंके यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी संदीप साळुंके यांनी उपचारादरम्यान शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले की, आम्ही एकत्रित कुटुंबात राहत असून माझे राहूरी फॅक्टरी बस स्टँड येथे स्वागत मेन्स पार्लर असून दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुमारास सलूनचे काम चालू असताना आरोपी ज्ञानेश्वर मोरे ,ज्ञानेश्वर वाघ ,नितीन वाघ व त्यांच्या सोबत असणारे अनोळखी पुरुषांनी एका खाजगी गाडीतून येऊन दुकानाच्या बाहेर बोलावले, माझी तंगडी धरून मला गाडीत बसून राहुरी फॅक्टरी येथील इंजिनिअरिंग कॉलेज मैदानात नेले. मला नितीन वाघ म्हणाला की , तू माझ्या बहिणीला मोटारसायकलवर बसवून सोडले. त्याला मी समजून सांगितले की, तिने मला सोडण्याची विनंती केली म्हणून तिला सोडवले. यात माझी काय चूक आहे. त्यावर सदर आरोपींनी त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.लाकडी लाकडी दांड्याने मारहाण जबरदस्त मारहाण केली.
दरम्यान संदीप साळुंके यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज तिसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलिसांमध्ये आरोपी ज्ञानेश्वर मोरे , ज्ञानेश्वर वाघ ,नितीन वाघ (रा.अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) व अनोळखी पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत