राहूरी(वेबटीम) वाढीव बिला संदर्भात मनसे राहूरी तालुक्यातील पदाधिकारी यांच्यावतीने राहूरी येथे महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले. य...
राहूरी(वेबटीम)
वाढीव बिला संदर्भात मनसे राहूरी तालुक्यातील पदाधिकारी यांच्यावतीने राहूरी येथे महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मनसे पदाधिकारी यांनी म्हंटले की, कोरोना काळात रिडींग न घेताच अव्वा च्या सव्वा विजबिले ग्राहकांना आली आहे. एकतर लॉकडाऊन काळात अनेकांना पगार नाही त्यात हा वाढीव विजबिलाचा शॉक बसला असून लवकरात लवकर ग्राहक लोकेशनवर जाऊन रिडींग घेऊनच त्यानुसार बिल द्यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मनसे राहुरी तालुका अध्यक्ष अनिल डोळस,तालुका सचिव अनिल गिते,राहुरी शहराध्यक्ष प्रतिक विधाते, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष आकाश भाऊ शिंदे, मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत