तलाठी कार्यालयातील सर्व्हर स्पीड गायब - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तलाठी कार्यालयातील सर्व्हर स्पीड गायब

 जामखेड(वेबटीम) दोन महिन्यांपासून तलाठी कार्यालय अवलंबून आसलेल्या कॉम्प्युटरच्या सर्व्हरचा स्पीड गायब झाल्याने तलाठी व मंडल आधिकारी चांगलेच ...

 जामखेड(वेबटीम)

दोन महिन्यांपासून तलाठी कार्यालय अवलंबून आसलेल्या कॉम्प्युटरच्या सर्व्हरचा स्पीड गायब झाल्याने तलाठी व मंडल आधिकारी चांगलेच हैराण झाले आहेत.  कार्यालयात येणाऱ्या खातेदार व कर्मचाऱ्यांमध्ये वाद देखील होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्व्हर स्पीडची समस्या वरीष्ठ कार्यालयातून सोडवण्यात यावी अशी मागणी जामखेड तालुका तलाठी संघाने केली आहे.

जामखेड तालुका तलाठी संघ व मंडल आधिकाऱी यांनी नुकतेच तहसीलदार यांना निवेदन देऊन वरीष्ठ कार्यालयातून समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. सर्व्हरला स्पीड नसल्याने गेल्या दोन महीन्यांपासून तलाठी यांना अडचणीत येत आहेत, सर्व्हर रोज सकाळी१०:३० ते ५ या वेळेत बंद असतो.कधी कधी स्पीड देखील येत नाही. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या शेतकरी खातेदार यांना ७ ×१२ काढून देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच फेरफार संबंधित कामे करणे शक्य होत नाही. दररोज सर्व्हर डाऊनचे उत्तर एकुण घेण्याच्या मनस्थितीत खातेदार राहीले नाहीत. खातेदार व तलाठ्यांमध्ये यामुळे अनेक वेळा वाद निर्माण होत आहेत. परीणामी तलाठी व मंडल आधिकाऱी हे मानसिक तणावाखाली सापडले आहेत. कार्यालयातील ई फेरफार संबधित कामकाज हे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. त्यामुळे या सर्व्हर स्पीड बाबत वरीष्ठ कार्यालयात तात्काळ कळवून य कायमस्वरूपी समस्या सोडवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देता वेळी जामखेड तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस.के. कारंडे उपाध्यक्ष एस. व्ही. कुटे, सरचिटणीस व्ही.व्ही मोराळे सह तालुक्यातील तलाठी व मंडल आधिकाऱी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत