जामखेड प्रतिनिधी आष्टी येथील पंचायत समिती सदस्य आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे हे आष्टी तालुक्यातील सुरडी या ठिकाणी आपल्या शेतात पाणी घा...
जामखेड प्रतिनिधी
आष्टी येथील पंचायत समिती सदस्य आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे हे आष्टी तालुक्यातील सुरडी या ठिकाणी आपल्या शेतात पाणी घालण्यासाठी गेले आसता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.
आष्टी तालुक्यात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे दिवसा शेतातील वीज गायप आसते त्यामुळे शेतकर्यांना रात्र रात्र जागुन आपल्या शेतात पाणी द्यावे लागते. याच अनुषंगाने आज मंगळवार दि २४ रोजी आष्टी तालुक्यात दिवसा वीज पुरवठा नव्हता. त्यामुळे सुरडी येथील पंचायत समिती सदस्य सौ आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे हे देखील सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतातील वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर ते आपल्या शेतात पाणी घालण्यासाठी गेले होते.
मात्र शेतात पाणी घालत आसताना सध्या लवकर अंधार पडत आसल्याने या आधाराचा फायदा घेत दडुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते जागी ठार झाले. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेता जवळ अढळुन आला. त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत