राहूरी(वेबटीम) छावा क्षात्रविर सेनेच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने संघटनेत एकच खळबळ उडाली ...
राहूरी(वेबटीम)
छावा क्षात्रविर सेनेच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने संघटनेत एकच खळबळ उडाली असून राजीनाम्याचे कारण मात्र समजू शकले नाही. पत्रकार परिषद घेऊन सौदागर सर्व सविस्तर माहिती देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सतीश सौदागर यांनी म्हंटले की, मी सतीश अशोक सौदागर ,छावा क्षात्रवीर सेना, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष या पदावर काम करत होतो.परंतु माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहोत तरी आपण सर्व राज्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अध्यक्ष यांनी माझा राजीनामा स्वीकारावा ही विनंती आपण मला आपल्या संघटनेमध्ये कार्य करण्यास संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे माझ्याकडून कुठल्याही प्रकारचे आपणास राज्य कार्यकारणी व पदाधिकारी चूक झाली असेल तर मी माफी मागतो.
दरम्यान सौदागर यांना शिवसेना, मनसे तसेच अन्य संघटनेकडून मोठी ऑफर आल्याचे चर्चेतून समजते.त्यांच्यासमोर अनेक पर्याय असल्याने ते विचार करून आपली पुढील वाटचाल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार असून छावा क्षात्रविर सेनेबद्दल नाराजी व्यक्त करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत