वळण(वेबटीम) राहुरी तालुक्यातील मानोरी येथील शिक्षक साहेबराव तोडमल यांची भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या अहमदनगर जिल्हा दक्ष...
वळण(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील शिक्षक साहेबराव तोडमल यांची भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या अहमदनगर जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते स तोडमल यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. राहुरी येथील श्री. संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या सभागृहात पंडित दिन दयाळ उपाध्य प्रशिक्षण शिबिर आयोजन प्रसंगी ही निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी दिलीप भालसिंग,नितीन उदमले,अनिल लांडगे,तनपुरे कारखान्याचे संचालक सुरशिंग पवार,किशोर वने,दादा पाटील सोनवने,राजेंद्र उंडे,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायवाड,शहाजी ठाकुर,तालुका अध्यक्ष अमोल भनगडे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रविंद्र म्हसे,साहेबराव म्हसे, नानासाहेब गागरे,अनिल आढाव,सिताराम ढोकणे,गणेश खैरे,अजित डावखर,शरद म्हसे,गोकुळदास आढाव,शिवाजी म्हसे,उत्तम खुळे,शहाराम आढाव,रविंद्र आढाव, आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत