तर राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांचं कौतुक करू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तर राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांचं कौतुक करू

  राहूरी(वेबटीम)  तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे राहुरी आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेला पाणी योजनेचे मंजुरी पञ दिल होतं पण त्यानंतर हे...

 राहूरी(वेबटीम)


 तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे राहुरी आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेला पाणी योजनेचे मंजुरी पञ दिल होतं पण त्यानंतर हे सरकार आल्यानंतर कुठलिही कारवाई झाली नाही म्हणून त्या पाणी योजनेचे काम पुर्ण करून शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणी द्या, आम्ही देखील तुमची पाठ थोपटु असं आवाहन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मंञी प्राजक्त  तनपुरेंना नाव न घेता केल आहे.तसेच तालुक्यातील ऊर्जा राज्यमंञ्याच्या महावितरण खात्यामधे शैतक-यांची मोठी गैरसोय होत असल्याची ठिका देखील कर्डिले यांनी केली आहे.

राहुरी शहरामधे भारतीय जनता पार्टीचे दोन दिवसीय  प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे होते तर व्यासपीठावर दिलीप भालसिंग,नितीन उदमले,अनिल लांडगे,सुरशिंग पवार,किशोर वने,दादा पाटील सोनवणे,राजेंद्र उंडे,सुभाष  गायवाड,शहाजी ठाकुर,अमोल भनगडे,रविंद्र म्हसे,साहेबराव म्हसे, नानासाहेब गागरे हे होते.

कार्यक्रमास अनिल आढाव,सिताराम ढोकणे,साहेबराव तोडमल,गणेश खैरे,अजित डावखर,शरद म्हसे,नामदेव कांबळे आदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत